Box Office Collection 9th September: मंगळवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

Published : Sep 10, 2025, 08:19 AM IST

बॉक्स ऑफिसवर सध्या 'बागी ४', 'परम सुंदरी' आणि 'द बंगाल फाईल्स' हे चित्रपट प्रदर्शित आहेत. 'बागी ४'ने ३८ कोटींचा टप्पा ओलांडला असून 'परम सुंदरी'नेही चांगली कमाई केली आहे.

PREV
15
Box Office Collection 9th September: मंगळवारी गाजत असलेल्या 'या' ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

सध्या बॉक्स ऑफिसवर द बंगाल फाईल्स, बागी ४ आणि परम सुंदरी हे चित्रपट सुरु आहेत. बागी ४ चित्रपटाने चांगली कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर चांगलीच हवा तयार केली आहे.

25
परम सुंदरी

परम सुंदरी हा सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ९.२५ कोटींची कमाई केली. साऊथ आणि नॉर्थ येथील लव्हबर्डसच्या गोष्टीवर आधारित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आहे.

35
बागी ४

बागी ४ चित्रपटात टायगर श्रॉफ आणि संजय दत्त हे प्रमुख अभिनेते असून बॉक्स ऑफिसवर त्यानं चांगला कलेक्शन जमवलं आहे. आतापर्यंत ३८ कोटींची या चित्रपटाने कमाई केली असून वर्ल्डवाईड ५० कोटींच्या पुढं हा चित्रपट गेला असेल. पहिल्या दिवशी चित्रपटाने १२ कोटींनी बॉक्स ऑफिस खोललं होतं.

45
द बंगाल फाईल्स

द बंगाल फाईल्स हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आला असून सुरुवातीच्या काळात चित्रपटाने चांगली कमाई केली नाही. मिथुन चक्रवर्तीचा प्रमुख अभिनय असलेल्या हा चित्रपट वादात सापडला होता. आतापर्यंत या चित्रपटाने ९ कोटींची कमाई केली आहे.

55
कुली

कुली हा अभिनेता रजनीकांतचा चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर तो चांगला चालला आहे. कुली चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा पार केला असून जगभरात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर डंका वाजवला आहे. रजनीकांतचे जगभरात फॅन्स असून त्यांनी या चित्रपटाला भरभरून प्रेम दिल आहे.

Read more Photos on

Recommended Stories