मुंबई - 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेफाली जरीवाला हिचे २७ जून २०२५ रोजी निधन झाले. ती ४२ वर्षांची होती. हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. जाणून घ्या शेफाली जरीवालाबद्दल सविस्तर...
कांटा लगा या गाण्याने तिला घराघरात ओळख मिळवून दिली
शेफाली जरीवाला एक अभिनेत्री, मॉडेल आणि नर्तकी होत्या. तिला विशेषतः म्युझिक व्हिडिओंसाठी ओळखले जात होते. तिची अनेक गाणी प्रसिद्ध होती. परंतु, कांटा लगा या गाण्याने तिला घराघरात ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिचा करिअरमध्ये एवढी प्रसिद्धी मिळाली नाही.
26
मुंबईत जन्म
शेफाली जरीवाला यांचा जन्म १५ डिसेंबर १९८२ रोजी मुंबईत झाला होता. तिने करिअरही मुंबईतच केले. बॉलिवूडमध्ये तिने अनेक गाण्यांसाठी मॉडेल म्हणून काम केले. तिला लहान वयात यशही मिळाले.
36
'बिग बॉस १३'
शेफाली जरीवाला 'बूगी वूगी', 'नच बलिए' आणि 'बिग बॉस १३' मध्ये दिसली होती. यावेळी ती चर्चेत आली खरी पण कांटा लगा सारखी प्रसिद्धी मिळवता आली नाही.
शेफाली जरीवाला 'मुझसे शादी करोगी' आणि कन्नड चित्रपट 'हुडुगारू' मध्ये दिसली होती. तिने हिंदीत एक आणि दक्षिणेत एक चित्रपट केला. पण त्यानंतर इतर कोणत्याही चित्रपटांमध्ये दिसली नाही.
56
'कभी आर कभी पार रीमिक्स'
'कांटा लगा' नंतर शेफाली 'कभी आर कभी पार रीमिक्स' मध्येही दिसली होती. तिचे कांटा लगा हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. यावेळी प्रत्येक ठिकाणी हेच गाणे दिसून येत होते.
66
मुले नव्हती
शेफाली जरीवाला यांनी दोनदा लग्न केले होते. त्यांना मुले नव्हती. दोन्ही लग्नाच्या वेळी याची चर्चा झाली होती. दुसर्या लग्नाची तर जरा जास्तच चर्चा होती. पण दोन्ही लग्नानंतर तिला मुले झाली नाहीत.