अक्षय कुमारच्या ताफ्यातील गाडीला भीषण धडक, अक्षय आणि ट्विंकल दोघेही सुरक्षित

Published : Jan 20, 2026, 07:58 AM IST
Bollywood Actor Akshay Kumar vehicles met with accident

सार

Bollywood Actor Akshay Kumar vehicles met with accident : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सुरक्षा ताफ्यातील गाडीला जुहूमध्ये अपघात झाला. एका भरधाव मर्सिडीजने रिक्षेला धडक दिल्याने ती रिक्षा अक्षयच्या ताफ्यातील गाडीवर आदळली. 

Bollywood Actor Akshay Kumar vehicles met with accident : बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार याच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला सोमवारी रात्री जुहू परिसरात अपघात झाला. एका भरधाव मर्सिडीज कारने रिक्षाला धडक दिल्याने ही रिक्षा थेट अक्षयच्या ताफ्यातील गाडीवर जाऊन आदळली. या घटनेत रिक्षाचालक जखमी झाला असून अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना सुरक्षित आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना परदेश दौरा संपवून विमानतळावरून आपल्या जुहू येथील निवासस्थानी परतत होते. त्यांचा ताफा मुक्तेश्वर रोडजवळ असताना मागून येणाऱ्या एका वेगवान मर्सिडीज कारने समोर असलेल्या रिक्षेला जोरदार धडक दिली. मर्सिडीजच्या धडकेमुळे रिक्षाचा वेग नियंत्रित न राहिल्याने ती अक्षय कुमारच्या ताफ्यात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर जाऊन आदळली.

अक्षय कुमार सुरक्षित

या अपघातावेळी अक्षय कुमार ज्या वाहनातून प्रवास करत होता, त्या गाडीला कोणतीही इजा पोहोचलेली नाही. अक्षय आणि ट्विंकल खन्ना दोघेही या अपघातातून सुखरूप बचावले असून त्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्यात आले आहे.

रिक्षाचालक जखमी; पोलिसांकडून गुन्हा दाखल

या विचित्र अपघातात रिक्षाचालकाला दुखापत झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी चालकाला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जुहू पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत मर्सिडीज चालकाविरोधात 'बेदरकारपणे आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याचा' गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांची भूमिका: जुहू पोलिसांनी सांगितले की, "आम्ही घटनेचा पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने अधिक तपास करत आहोत. मर्सिडीज चालक दोषी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे."

सध्या पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Bigg Boss Marathi | अनुश्री माने-राकेश बापट वाद; राकेश घर सोडणार का? | Anushree Vs Rakesh
Bigg Boss Marathi Elimination | दिव्या शिंदे सेफ? पहिली एलिमिनेशन; 9 सदस्य नॉमिनेट