उद्यापासून BIGG BOSS Marathi चा तुफान राडा, रंगतदार ग्रॅंड प्रीमियरचा रंगणार सोहळा!

Published : Jan 10, 2026, 12:32 PM IST

BIGG BOSS Marathi will begin from tomorrow 8 pm Riteish Deshmukh host : बिग बॉस मराठी उद्या रविवारी सायंकाळी ८ वाजता कलर्स आणि जिओ हॉटस्टारवर सुरु होणार आहे. जाणून घ्या यावेळी काय आकर्षण राहणार आहेत. 

PREV
16
उद्या ग्रॅंड रंगारंग सोहळा

महाराष्ट्राचं तुफान उद्यापासून थेट घराघरात शिरणार आहे! प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ अखेर उद्यापासून सुरू होत आहे. या भव्य ग्रँड प्रीमियरमध्ये प्रेक्षकांना पहिल्याच क्षणापासून भेटणार आहे मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीचा लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख. आपल्या खास स्टाइलमध्ये, विनोदाची फटकार आणि गरज पडल्यास कडक भूमिकेत दिसणारे रितेश देशमुख यंदाही बिग बॉसच्या घरातल्या खेळाला दिशा देणार आहेत.

26
नवीन चेहरी दिसतील

यासोबतच त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने ग्रँड प्रीमियरला मिळणार आहे जबरदस्त एनर्जी आणि ग्लॅमरची झलक, जी प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. नवे पर्व, नवा खेळ आणि नवे चेहरे... बिग बॉस मराठी सीझन ६ - ११ जानेवारीपासून दररोज रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर.

36
उत्सूकता वाढलीये

ग्रँड प्रीमियरपूर्वी प्रदर्शित झालेल्या सहभागींच्या अनरिव्हील प्रोमोनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. कुणी सौंदर्य आणि अदा घेऊन येणारं फूलनदेवी रूप, कुणी कातिल डान्स मूव्ह्जने घायाळ करणारी अदा, तर कुणी घरात धुमाकूळ घालणारी दमदार एन्ट्री या झलकांमधून अनेक नावांवर चर्चा रंगू लागली आहे.

46
कोण कोण घरात करणार प्रवेश

सोशल मीडियावर “हे सहभागी नेमके कोण?” असा प्रश्न सध्या सर्वत्र विचारला जात असून अंदाजांचे खेळ रंगले आहेत. उद्या अखेर दार उघडणार आणि समजणार की ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा कोण-कोण प्रवेश करणार!

56
सीझन ६ चे दार उघडणार

नशिबाचा खेळ, डावपेचांची सुरुवात आणि तुफान मनोरंजन हे सगळं नक्की पहा. बिग बॉस मराठी सीझन ६, उद्यापासून रात्री ८ वाजता, फक्त कलर्स मराठी आणि JioHotstar वर.

66
उद्यापासून वादावादी

उद्यापासून बिग बॉसच्या घरात शिरलेल्या स्पर्धकांमध्ये जोरदार वादावादी आणि मनोरंजनपर गोष्टी दिसून येतील. स्पर्धक कोण असतील याची उत्सुकता वाढली आहे. 

Read more Photos on

Recommended Stories