Bollywood Actors Threat Case : लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आयुष्मान-तुषारला धमकी! बंगळुरूतून आयटी इंजिनिअरला अटक

Published : Nov 05, 2026, 12:30 PM IST

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांना ऑडिओ मेसेज पाठवून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने बंगळुरूमधून वैभव मिश्रा नावाच्या एका आयटी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

PREV
15
लॉरेन्स बिश्नोई गँग

लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर आणि आयुष्मान खुराना यांना ऑडिओ मेसेज पाठवून धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने बंगळुरूमधून एका आयटी कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

वैभव मिश्रा असं या आरोपीचं नाव आहे. अनेक सेलिब्रिटींना धमकीचे मेसेज पाठवल्याच्या तपासात पोलिसांनी त्याला बंगळुरूतून बेड्या ठोकल्या.

आरोपीचा खरंच बिश्नोई गँगशी काही संबंध आहे का आणि खंडणीची मागणी किती खरी आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

25
बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी

बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी दिल्याप्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरूमधून वैभव मिश्रा नावाच्या आयटी कर्मचाऱ्याला अटक केली.

तुरुंगात असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने वैभव ऑडिओ मेसेज पाठवायचा, असा पोलिसांचा दावा आहे. आयुष्मान खुराना आणि तुषार कपूर यांनाही असेच धमकीचे मेसेज आले होते.

तपास अधिकारी आता या ऑडिओ रेकॉर्डिंगची तपासणी करत आहेत. फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना टार्गेट करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढल्याने चिंता वाढली आहे.

35
लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य

लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याची बतावणी करत एका व्यक्तीने बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला ऑडिओ मेसेज पाठवल्याची माहिती आहे.

मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलरने अभिनेत्याला धमकी देऊन कोट्यवधी रुपयांची मागणी केली. मेसेजमधील दाव्यांची पडताळणी करण्यासाठी आणि कॉलरची ओळख पटवण्यासाठी तपास अधिकारी ऑडिओ रेकॉर्डिंगचं व्हॉईस अ‍ॅनालिसिस करत आहेत.

सेलिब्रिटींना टार्गेट करून खंडणी उकळण्याचा हा मोठा कट होता का, याचाही पोलीस तपास करत आहेत.

45
अभिनेता तुषार कपूर

अभिनेता तुषार कपूरलाही ५ कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन आला होता. तिथेही कॉलरने स्वतःला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचं सांगितलं होतं.

आयुष्मान आणि इतर सेलिब्रिटींना आलेल्या ऑडिओ धमक्यांचा तुषारला आलेल्या फोन कॉलशी काही संबंध आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

सुरुवातीला तुषारला आलेला कॉल फेक असल्याचा संशय होता. व्हॉईस अ‍ॅनालिसिसमध्येही कॉलरचा आवाज आणि रेकॉर्डिंगमध्ये तफावत आढळली होती.

आता बंगळुरूतून वैभव मिश्राच्या अटकेचा या धमक्यांशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे.

55
तपास मुंबई क्राईम ब्रांचकडून सुरू

अटक केलेल्या आरोपीचा खरंच लॉरेन्स बिश्नोई गँगशी काही संबंध आहे, की त्याने फक्त सेलिब्रिटींना घाबरवून पैसे उकळण्यासाठी गँगस्टरचं नाव वापरलं, याचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करत आहे.

अलीकडेच बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करून गँगस्टरच्या नावाने दिल्या जाणाऱ्या खंडणीच्या धमक्या मुंबई पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहेत.

आरोपीची नेमकी भूमिका काय, ऑडिओ रेकॉर्डिंगची सत्यता आणि या प्रकरणात आणखी कुणी सामील आहे का, हे शोधण्यासाठी वेगाने तपास सुरू आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories