बॉलीवुडमध्ये अनेक वेळा एकाच नावाने अनेक चित्रपट बनले. विशेष म्हणजे अनेकदा एकाच नावाने बनलेल्या या चित्रपटांमध्ये एकाच अभिनेत्याने काम केले आहे. अशा ३ चित्रपटांबद्दल जाणून घ्या, ज्यापैकी दोन २-२ वेळा आणि एक ३ वेळा एकाच नावाने एकाच अभिनेत्यासोबत बनले.
आम्ही ज्या तीन चित्रपटांबद्दल बोलत आहोत ते 'कंगन', 'अफसाना' आणि 'इंतकाम' आहेत. यापैकी 'कंगन' तीन वेळा आणि उर्वरित दोन २-२ वेळा बनले. या सर्व चित्रपटांमध्ये जो एक अभिनेता समान होता तो म्हणजे दादा मुनि म्हणून ओळखले जाणारे अशोक कुमार.
23
लीला चिटणीस यांचे दिग्दर्शन
'कंगन' नावाचा पहिला चित्रपट १९३९ मध्ये आला होता. लीला चिटणीस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि त्यांच्यासोबत अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते.
33
पद्मिनीची प्रमुख भूमिका
दिग्दर्शक ब्रिज १९६६ मध्ये 'अफसाना' नावाचा चित्रपट घेऊन आले. या चित्रपटात अशोक कुमार, प्रदीप कुमार आणि पद्मिनी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या.