स्वतःच्या स्वार्थासाठी कलाकारांचं शोषण केलं जातं, 'या' मोठ्या गायकाने बॉलिवूडवर केला गंभीर आरोप

Published : Oct 19, 2025, 11:02 AM IST
AP Dhillon

सार

पंजाबी गायक एपी ढिल्लोनने एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये काम न करण्यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. तो म्हणाला की, निर्माते स्वतःच्या फायद्यासाठी कलाकारांचे आणि त्यांच्या कलेचे शोषण करतात, गाण्यांचे सर्व हक्क स्वतःकडे ठेवतात.

पंजाबी सिंगर एपी ढिल्लोन याने मुलाखत दिली असून त्यामध्ये तो बॉलिवूडमध्ये काम का करत नाही यावर स्पष्टीकरण दिलं आहे. टॉप प्रोड्यूसर्स आणि ए-लिस्ट स्टार्सकडून अनेक ऑफर मिळाल्या असूनही, त्यांनं त्यांच्यासोबत कधीही काम केलं नाही. काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली, स्वतःच्या स्वार्थासाठी कलाकारांचं आणि त्यांच्या कलेचं शोषण केलं जातं.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता पण…

यावेळी बोलताना एपी म्हणाला की, त्यांनं इंडस्ट्रीतील दोन मोठ्या नावांच्या चित्रपटासाठी एक ट्रॅक फायनल केला होता. ण शेवटी ते ऍग्रिमेंट रद्द झालं आणि त्यानं गाण्याची मालकी सोडण्यास नकार दिला. एपी म्हणाला की, तुम्हाला सांगतो की आजपर्यंत मी कोणतंही बॉलिवूडचं काम केलं नाही कारण मला माझ्या लोकांची काळजी आहे.

मला गाण्यास आनंद होईल, पण 

त्यांना पद्धत बदलावी लागेल एपी यावेळी बोलताना म्हणाला की, त्यांना पद्धत बदलावी लागणार आहे. जेव्हा एखादा पंजाबी कलाकार बॉलिवूड चित्रपटाला गाणं देतो तेव्हा निर्मात्याकडे सर्वकाही असतं - ट्रॅक, रीमिक्स अधिकार, सर्वकाही. ते स्वतःच्या फायद्यासाठी गाणं आणि कलाकाराचं शोषण करतात. म्हणून मी नकार दिला.' ज्या घटनेनं त्याचा दृष्टिकोन बदलला त्यात दोन मोठे कलाकार होते.

काही मोठ्या कलाकारांना माझं संगीत हवं होतं 

काही मोठ्या कलाकारांना त्यांच्या चित्रपटात माझं गाणं हवं होतं. मी गाणं तयार केलं. पण त्यांना गाणं, त्याचे हक्क, सर्वकाही ठेवायचे होते. हे बरोबर नाही. म्हणून मी त्यांना सांगितलं की ते बदलल्याशिवाय मी त्यांच्यासोबत काम करू शकत नाही.' एक अशी अडचण आहे की, 'एकच अडचण अशी आहे की, इतर ए-लिस्टर्स अजूनही गाणी देत आहेत. जोपर्यंत ते 'नाही' म्हणत नाहीत, तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकणार नाही. कारण जर मी नकार दिला तर बॉलिवूड निर्माते पुढच्या मोठ्या पंजाबी कलाकाराकडे जातील. तरीही आपण फक्त तीन किंवा चार आहोत.'

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Avatar Fire and Ash Day 1 Box Office Collection : पहिल्याच दिवशी कमावले 500 कोटी!
मुंबईत अंकिता लोखंडेचे 100 कोटींचे अपार्टमेंट, पाहा व्हाईट थीम इंटिरियरचे खास फोटो