
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर यांनी मुंबईत एक नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. रिअल इस्टेट मार्केटप्लेसनुसार, अनिल यांनी ही प्रॉपर्टी त्यांचे पूत्र हर्षवर्धन कपूर यांच्यासोबत खरेदी केली आहे. त्याचे नोंदणीकरण ऑगस्ट २०२५ मध्ये झाले आहे. हे अपार्टमेंट द स्मोकी हिल सीएचएस लिमिटेडमध्ये आहे. त्याचे बिल्ड अप क्षेत्र १०८.२५ चौरस मीटर आणि कार्पेट क्षेत्र ९० चौरस मीटर आहे. त्यासोबतच त्यांना या फ्लॅटसोबत एक गॅरेज मिळाले आहे.
अनिल कपूर आणि हर्षवर्धनचे अपार्टमेंट बांद्रा वेस्टमध्ये आहे. हे मुंबईतील सर्वात महागड्या रिअल इस्टेट बाजारपेठांपैकी एक मानले जाते. हा परिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, बांद्रा रेल्वे स्थानक आणि येणाऱ्या मेट्रो मार्गासोबतच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी), लोअर परळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या ठिकाणांशी थेट जोडलेला आहे. म्हणूनच येथे सर्वजण गुंतवणूक करत आहेत. अनिलने हे अपार्टमेंट ५ कोटींना खरेदी केले आहे. त्यासाठी त्यांनी ३० लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपयांचा नोंदणी शुल्क भरला आहे.
अनिल शेवटचा अयान मुखर्जीच्या 'वॉर २' चित्रपटात दिसले होते, ज्यात ऋतिक रोशन, कियारा आडवाणी आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात अनिलने रॉ प्रमुख कर्नल विक्रांत कौलची भूमिका साकारली होती. अनिलचा मुलगा हर्षवर्धन कपूर यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी २०१६ मध्ये आलेल्या 'मिर्झ्या' चित्रपटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ते शेवटचे 'थार' मध्ये दिसले होते, जो २०२२ मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. तेव्हापासून, ते कोणत्याही चित्रपटात नव्हते आणि त्यांनी कोणत्याही नवीन चित्रपटाची घोषणा केलेली नाही. हर्ष २०२३ मध्ये अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये अभिनेता आणि निर्माता म्हणून काम करणार होते, पण नंतर हा प्रकल्प थांबवण्यात आला आहे.