प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नैराश्येला वैतागून अमृताने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.तिने घेतलाल्या टोकाच्या निर्णयामुळे भोजपुरी सिनेसृष्टीला देखील मोठा धक्का बसला आहे.
प्रसिद्ध भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नैराश्येला वैतागून अमृताने आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. तिचा मृतदेह भागलपूर येथील तिच्या राहत्या घरी सापडला आहे. अमृता ही तिच्या बहिणीच्या लग्नासाठी तिच्या नवऱ्यासोबत गेली होती. लग्नानंतर तिचा पती पुन्हा मुंबईला परतला आणि अमृताने तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान तिने टोकाचे पाऊल उचलले आणि आत्महत्या केली.
घरच्यांनी तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पहिले असता त्यांनी तिला लगेच खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झालेला होता. याविषयी माहिती अशी की, तिने हे पाऊल उचलण्याआधी सोशल मीडियावर एक स्टेट्स ठेवले होते त्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. तिने घेतलाल्या या टोकाच्या निर्णयामुळे भोजपुरी सिनेसृष्टीला देखील मोठा धक्का बसला आहे.
अमृताने आत्महत्या का केली ?
पोलिसांनी तपासादरम्यान तिच्या वस्तूंची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांनी तिचा फोन जप्त केला आहे. त्यावेळी असं लक्षात आलं की, अमृताने गळफास घेण्याआधी तिच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं होतं. सकाळी 10.15 वाजता तिने तिच्या व्हॉट्सअॅपवर हे स्टेटस ठेवलं होतं. 'दोन बोटींवर त्याचं आयुष्य अवलंबून का होतं? आम्ही एक बोट बुडवून त्याचं आयुष्य सोप्पं केलं,' असं स्टेटस तिने तिच्या व्हॉट्सअॅपवर ठेवलं होतं.त्यांनतर आत्महत्या केल्याचे दिसून आले.
नैराश्येतून आत्महत्या केल्याचं समोर :
मागील अनेक दिवसांपासून अमृता ही नैराश्येचा सामना करत असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. तिच्या कुटुंबियांनी देखील पोलिसांना अशी माहिती दिली. पण नुकतच अमृता ही तिच्या प्रतिशोध या वेबसीरिजमध्येही झळकणार होती. तिची ही वेब सीरिज हॉरर होती. पण त्याचदरम्यान अमृता ही डीप्रेशनवरही उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीये. पण तिने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे तिच्या मृत्यूबाबत काही प्रमाणात संशय देखील व्यक्त केला जातोय. सध्या पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.