
मुंबई : आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा अभिनय आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ती जेव्हाही कॅमेऱ्यासमोर येते, तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळतात. पण सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
आलिया नुकतीच एका ग्लॅमरस इव्हेंटमध्ये देसी लूकमध्ये पोहोचली होती. तिने गोल्डन रंगाचा फ्रंट-कट सूट, हाय हिल्स, निळ्या खड्यांची ज्वेलरी आणि अगदी साधा मेकअप केला होता. पण जेव्हा ती फोटोग्राफर्सना पोझ देऊ लागली, तेव्हा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी तिची तुलना थेट ट्विंकल खन्नाशी करायला सुरुवात केली.
आलियाचे डोळे आणि तिची हेअरस्टाईल पाहून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं. तिच्या या लूकबद्दल सांगायचं तर, तिने 'पीसी तोतुका अँड सन्स'चा निळ्या खड्यांचा आणि डायमंडचा चोकर नेकलेस घातला होता. यासोबतच तिने एका प्रमोशनल इव्हेंटसाठी 'मयूर गिरोत्रा कुटूर'चा गोल्ड ब्रोकेड जॅकेट ड्रेस परिधान केला होता.
एका युजरने लिहिलंय, "ती माधुरी, ट्विंकल खन्ना आणि डिंपल यांची म्हातारी आवृत्ती वाटतेय."
दुसऱ्या एकाने कमेंट केली, "ती सुंदर आहे, निगेटिव्ह कमेंट्स करणं थांबवा. पण तिची तुलना कतरिना आणि दीपिकाशी होऊ शकत नाही, त्या चाळिशीतही तिच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतात."
आणखी एकाने विचारलं, "आलूच्या डोळ्यांना काय झालंय?"
कामाच्या बाबतीत बोलायचं तर, आलिया लवकरच 'लव्ह अँड वॉर' आणि 'तुंबाड-२' मध्ये दिसणार आहे.