Ajay Devgn: अजमेर शरीफ दर्ग्यात अजय देवगणचा पारा चढला, मुलगा युगसोबत असताना गर्दीने घेरले (WATCH)

vivek panmand   | CMS
Published : Oct 30, 2026, 09:30 PM IST
Ajay Devgn: अजमेर शरीफ दर्ग्यात अजय देवगणचा पारा चढला, मुलगा युगसोबत असताना गर्दीने घेरले (WATCH)

सार

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुलगा युगसोबत राजस्थानमधील अजमेर शरीफ दर्ग्यात दर्शनासाठी पोहोचला होता. मात्र तिथे चाहत्यांच्या अफाट गर्दीने दोघांना घेरले. या गदारोळात अजय देवगणचा पारा चढल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण नुकताच आपला मुलगा युग देवगण याच्यासोबत राजस्थानच्या प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यात दर्शनासाठी गेला होता. अध्यात्मिक आणि शांत वातावरणात दर्शन घेण्याचा त्यांचा बेत होता. पण तिथे चाहत्यांनी आणि लोकांनी प्रचंड गर्दी केली आणि तिथे अचानक गोंधळ उडाला.

सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये अजय देवगण गर्दीतून वाट काढण्यासाठी धडपडताना दिसतोय. लोक फोटो घेण्यासाठी आणि अजय-युगची एक झलक पाहण्यासाठी एकमेकांना ढकलत होते. यामुळे तिथे परिस्थिती खूपच बिघडली होती.

या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आता दर्ग्यातील सुरक्षेवर आणि गर्दीच्या नियोजनावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

व्हिडिओ व्हायरल: गर्दीच्या गोंधळात अजय देवगण संतापला

अजमेर शरीफ दर्ग्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लोकांच्या गर्दीत अजय देवगण एका व्यक्तीवर चांगलाच भडकलेला दिसतोय. गर्दीच्या दणक्याने त्रस्त झालेला अजय उघडपणे आपला राग व्यक्त करताना दिसतोय, तर सुरक्षा रक्षक परिस्थिती सांभाळत दोघांना रस्ता करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकांनी अभिनेत्याला चोहोबाजूने घेरल्यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या व्हिडिओनंतर तिथे काही मारामारी झाली का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण अजय देवगणचे कोणाशी भांडण झाल्याचा किंवा हाणामारीचा कोणताही पुरावा नाही.

गर्दी वाढल्यामुळे आणि पुढे जाणे अशक्य झाल्यामुळेच अजय देवगणने असा संताप व्यक्त केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

मुलगा युगच्या सुरक्षेसाठी अजय देवगण दिसला चिंतीत

या व्हायरल व्हिडिओमध्ये अजय देवगण आपल्या मुलाच्या सुरक्षेसाठी अत्यंत काळजीपोटी पावले उचलताना दिसतोय. लोक जवळ येत असताना तो युगचा बचाव करत होता आणि त्याला सुरक्षितास्थळी नेण्याचा प्रयत्न करत होता.

मोठ्या कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी जाताना गर्दीचा कसा सामना करावा लागतो, हेच या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आले आहे. चाहते प्रेमापोटी गर्दी करतात खरी, पण अशा अनियंत्रित गर्दीमुळे अनेकदा परिस्थिती बिकट आणि धोकादायक बनते.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Rajinikanth: कंडक्टर ते सुपरस्टार! रजनीकांत यांच्या आयुष्यातील 10 धडे जे तुमचं आयुष्य बदलू शकतात
Akka Web Series: कीर्ती सुरेश की राधिका आपटे, नेटफ्लिक्सच्या 'अक्का' मालिकेत कोणी मारली बाजी?