अभिषेक, आराध्यासोबतचा सेल्फी ऐश्वर्याने ठेवला डीपी, घटस्फोटाच्या चर्चांना दिला विराम

Published : Apr 21, 2025, 01:40 PM ISTUpdated : Apr 21, 2025, 05:11 PM IST
Aishwarya Rai shares new pic with Abhishek Bachchan on 18th wedding anniversary,

सार

Aishwarya Rai Shares New Pic: अभिनेत्री ऐश्वर्या रायने लेक आराध्या आणि पती अभिषेक बच्चनसोबत अखेर फोटो शेअर केला आहे. यामुळे दोघांच्या घटस्फोटाला पूर्णविराम मिळाल्याचे दिसतेय. 

Aishwarya Rai shares pic with Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन तसेच त्यांची मुलगी आराध्यासोबतचा सेल्फी डीपीला ठेवून घटस्फोटाच्या चर्चांना विराम दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या घटस्फोटाची खरमरीत चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली होती.

लग्नाच्या १८ व्या वाढदिवशी काल (रविवारी) ऐश्वर्याने कौटुंबिक फोटो शेअर केला आहे. फोटोत आराध्यासह तिघांनी पांढर्या रंगाचे कपडे घातल्याचे दिसून येत आहे.

यावर दोघांच्या फॅन्सनी लगेच प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, की या पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चा आता थांबतिल. तर दुसर्या युजरने सांगितले, की बर्याच दिवसांनी दोघांना एका फ्रेममध्ये बघून खूप आनंद होत आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मुंबईत झालेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न सोहळ्याला बच्चन कुटुंबिय एकत्र आले होते. मात्र ऐश्वर्या आणि आराध्या वेगळ्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली होती.

सोशल मीडियावर नुकतीच अभिषेक आणि निमरत कौर यांचे अफेअर सुरु असल्याचे व्हायरल झाले होते. २०२२ मध्ये दास्वीसाठी दोघांनी एकत्र काम केले होते.

आराध्याच्या १३ व्या वाढदिवशी ऐश्वर्याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोतही अभिषेक दिसून आला नव्हता.

संजय गढवी यांच्या २००६ मध्ये आलेल्या धूम-२ या चित्रपटाच्या वेळी दोघे प्रेमात पडले होते. त्यांनी २० एप्रिल २००७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०११ मध्ये आराध्याचा जन्म झाला होता.

PREV

Recommended Stories

700 कोटींची मालकीण अभिनेत्री, 10 वर्षांनी लहान मुलाशी केले लग्न, वाचा बेडरुम सिक्रेट?
10 भाषांमध्ये 90 चित्रपट, पण 50 वर्षांनीही सर्वांना आवडणारी अविवाहित अभिनेत्री कोण?