या संपूर्ण प्रकरणामुळे मृणालला लाज वाटली आणि तिने अखेर सार्वजनिकरित्या माफी मागितली. तिने स्पष्ट केले की, ही मुलाखत दिली तेव्हा ती फक्त १९ वर्षांची होती आणि त्या वयात तिने केवळ खेळकर, विनोदी पद्धतीने काही बोलले होते. तिचा कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, पण शब्दांचा अर्थ चुकीचा लागल्याने वाद निर्माण झाला. मृणालने सांगितले की, त्या काळात ती अजून शिकत होती, अनुभव कमी होता आणि त्यामुळे काही बोलणे गैरसमजास कारणीभूत ठरले. तिने बिपाशा बासू यांचा सन्मान करत त्यांच्याबद्दल नेहमीच आदराची भावना असल्याचे सांगितले आणि भविष्यात अधिक जबाबदारीने बोलण्याचे आश्वासन दिले.