
मागील काही दिवसांपासून गोविंदा परत एकदा चर्चेत आला आहे. त्यामध्ये काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, गोविंदाची पत्नी सुनिता आहूजा यांनी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज देखील केलाय. मागील काही दिवसांपासून दोघे विभक्त देखील राहत होते. आता गोविंदाच्या चाहत्यांना परत एकदा मोठा धक्का बसला आहे.
घटस्फोटाच्या चर्चांना गोविंदा हा गायब झाला आहे. गोविंदाच्या पत्नीने ५ डिसेंबर २०२४ रोजी बांद्रातील कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. गोविंदाच्या घटस्फोटासाठी एक मराठी अभिनेत्री कारणीभूत ठरली आहे. ३० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचे संबंध असल्यामुळं बायकोसोबत घटस्फोटाला कारण ठरत असल्याचं म्हटलं आहे.
सुनीता आहुजा या काही दिवसांपासून गोविंदासोबत नात्यांबाबत विधान करत असल्याचं म्हटलं आहे. सुनीता आहुजा यांची मुलाखत परत एकदा चर्चेत आली आहे. त्या एकप्रकारे हात सोडून गोविंदाला परत येण्यास सांगताना दिसत आहेत. हेच नाही तर माझ्या इतके प्रेम गोविंदावर दुसरे कोणीही करू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
गोविंदाला भूक कधी लागते, त्याला कधी अॅसिडिटी होते, त्याला कधी काय पाहिजे हे फक्त मला माहिती आहे. मी जितके गोविंदाला ओळखते तितके त्याला कोणीच ओळखू शकत नाही. मी त्याच्यावर मनातून प्रेम करते. माझ्या इतके प्रेम त्याच्यावर दुसरे कोणीच करू शकत नाही. सुनिता आहूजा यांनी पुढे म्हटले की, मला 90 दशकातील गोविंदा आवडतो, असं सुनीता आहुजा यांनी म्हटलं आहे.