husband murder : अनैतिक संबंधांसाठी लक्ष्मी माधुरी नावाच्या महिलेने पतीला बिर्याणीत झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या. त्यानंतर प्रियकर गोपीसोबत मिळून उशीने दाबून पतीची हत्या केली.
आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील सिलुवूर येथील शिव नागराजू (45) आणि त्यांची पत्नी लक्ष्मी माधुरी (37) यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. लक्ष्मी एका सिनेमागृहात तिकीट काउंटरवर काम करत होती. तिथे तिची ओळख गोपी नावाच्या व्यक्तीशी झाली. या ओळखीचे रूपांतर नंतर अनैतिक संबंधात झाले.
25
अनैतिक संबंधातून पतीची हत्या -
पती नसताना लक्ष्मी माधुरी प्रियकराला घरी बोलावून मौजमजा करत असे. यावेळी अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीला मारण्याचा तिने कट रचला. तिने 20 झोपेच्या गोळ्यांची पूड करून बिर्याणीत मिसळून पतीला दिली. खाल्ल्यानंतर काही वेळातच शिवनागराजू गाढ झोपी गेला.
35
अनैतिक संबंधातून पतीची हत्या -
त्यानंतर लक्ष्मी माधुरीने प्रियकर गोपीला फोन करून घरी बोलावले. दोघांनी मिळून शिवनागराजूच्या चेहऱ्यावर उशी दाबून त्याला तडफडून मारले. पतीच्या हत्येनंतर, ती आणि तिचा प्रियकर मृतदेहाजवळ बसून अश्लील चित्रपट पाहत होते आणि त्यांनी शारिरीक संबंधही ठेवले.
पतीने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावल्याचा विश्वास तिने गावकऱ्यांना दिला. पण शिवनागराजूच्या वडिलांनी आणि मित्रांनी मृतदेह पाहिला तेव्हा जखमा आणि रक्ताचे डाग दिसल्याने त्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. छातीवरील जखमा आणि गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले.
55
अनैतिक संबंधातून पतीची हत्या -
यानंतर पोलिसांनी लक्ष्मी माधुरीला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. तिचा मोबाईल तपासला असता, तिने शेवटचे गोपी नावाच्या व्यक्तीशी बोलल्याचे समोर आले. अखेर, प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याची कबुली लक्ष्मी माधुरीने दिली. त्यानंतर दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले.