
मुंबईतील एका डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने सहा पानांची सुसाईड नोट लिहून आपली वेदना व्यक्त केली आहे. डॉ. स्तुती सोनवणे या तरुणीने आपला प्रियकर फैजल मोहम्मद खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
त्यांच्यात दोघांमध्ये प्रेमसंबंध कसे तयार झाले याबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, तू मला खूप अपमानित केलस, तुझे कठोर शब्द माझ्यासाठी असह्य झालं. आता मी आयुष्य संपल्यावर तुझा पुरुषी अहंकार होईल असे तिने म्हटले आहे. ती पुढं म्हटलं आहे की, मला अजूनही तुझ्यासोबत राहायचे होते, पण तू माझ्यावर इतका रागावला होतास की मी समोर असते तर कदाचित तू मला मारले असतेस किंवा खूप हिसंक झाला अस्तास असेही तिने यामध्ये म्हटले आहे.
तिने पुढे लिहिले आहे की, प्रियकराने तिच्याबद्दल आपल्या वडिलांनी केलेल्या टीकेला योग्य ठरवले होते, तुझ्या वडिलांनी म्हटलं होत की, तरुण मुली चांगल्या असतात आणि तुही त्यांना बरोबर ठरवलंस असं तिने म्हटलं आहे. त्यांच्या नात्यात प्रियकर हा बंबल अँपवर सक्रिय असल्याचा आरोप केला आहे. तरीसुद्धा मी तुला माफ केले, कदाचित माझ्यात स्वाभिमान नव्हता. तिने दोन वर्षांपासून जास्त अधिक काळ सोबत असल्याचे आरोप केले आहेत.