Pune Crime : पुण्यातील खासगी विद्यापीठाची अडीच कोटींनी फसवणूक; हैदराबादहून उच्चशिक्षित तरुण अटकेत

Published : Sep 25, 2025, 08:50 AM ISTUpdated : Sep 25, 2025, 09:22 AM IST
pune university

सार

Pune Crime : पुण्यातील खासगी विद्यापीठाची २.४६ कोटींनी फसवणूक करणाऱ्या हैदराबादस्थित उच्चशिक्षित सितैया किलारुला पुणे पोलिसांनी अटक केली. आरोपीने स्वत:ला ‘आयआयटी प्राध्यापक’ म्हणून भासवले आणि सरकारी प्रकल्पाच्या नावाखाली पैसे उकळले. 

Pune Crime : पुण्यातील कोथरुड परिसरातील एका नामांकित खासगी विद्यापीठाची तब्बल २ कोटी ४६ लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर ब्रांचने हैदराबाद येथे सापळा रचून ३४ वर्षीय सितैया किलारु याला अटक केली. न्यायालयाने त्याला २८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपीने स्वत:ला ‘आयआयटी मुंबई’तील प्राध्यापक असल्याचे भासवले. त्याने सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन प्रकल्पाचा करार मिळवून देण्याचे आश्वासन देत पुण्यातील एका प्राध्यापकाचा विश्वास संपादन केला. फोन व ई-मेलद्वारे सातत्याने संपर्क साधून त्याने विद्यापीठाकडून टप्प्याटप्याने २ कोटी ४६ लाख रुपये उकळले. मात्र, करारासाठी न आल्याने विद्यापीठ प्रशासनाला फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि त्यांनी तक्रार नोंदवली.

सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपीचे खरे नाव व माहिती समोर आली. तो मूळचा विजयवाडा येथील असून, २०१० मध्ये ईएनटीसी अभियांत्रिकी पूर्ण करून पुढील शिक्षणासाठी ब्रिटनला गेला होता. तेथे त्याने स्टॅफोर्डशायर व बर्मिंगहॅम विद्यापीठांतून पदव्युत्तर आणि पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर हैदराबादमधील दोन विद्यापीठांत नोकरी केली. एवढेच नव्हे, तर त्याने २०१९ व २०२० मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुख्य टप्प्यापर्यंत मजल मारली होती.

पोलिसांचे पथक १८ सप्टेंबर रोजी हैदराबादला रवाना झाले होते. चार दिवसांच्या शोधानंतर २१ सप्टेंबर रोजी याप्रल भागात सापळा रचून आरोपीला पकडण्यात आले. त्यानंतर न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांड घेऊन त्याला पुण्यात आणण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

आरोपीकडून तब्बल ४९ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त** करण्यात आला. यात १० बँकांचे एटीएम कार्ड, १३ पासबुक, १५ चेकबुक, सिमकार्ड, कम्प्युटर, मोबाईल, टॅब, दागदागिने, सोने खरेदी पावत्या आणि ४८ लाख रुपये किमतीच्या दोन कार यांचा समावेश आहे. आरोपीवर हैदराबादमध्ये यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, त्याला ऑनलाइन जुगाराचे व्यसन आहे. पुण्यातील विद्यापीठाकडून घेतलेल्या पैशांपैकी तब्बल **सव्वाकोटी रुपये त्याने ऑनलाइन जुगारात उधळल्याची कबुली** दिली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून