Pune Lohagad I केतनचा मारेकरी चेतनच्या काकाचा अजब दावा

Published : Jun 24, 2026, 10:54 PM IST
ketan agarwal murder

सार

पुणे येथील केतन अग्रवाल हत्याकांडात त्याची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी त्याला लोहगडावरून ढकलून हत्या केल्याचे समोर आले आहे. आता मात्र, चेतनच्या काकांनी तो निर्दोष असून त्याला खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे, ज्यामुळे या प्रकरणात नवीन वळण आले आहे.

पुणे येथील केतन अग्रवाल हत्याकांडामुळं संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. त्याची होणारी बायको सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी मिळून केतनला लोहगडावरून ढकलून दिलं. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांनी मिळून त्याची हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. आता मात्र चेतनच्या काकांनी तो निर्दोष असल्याचं म्हटलं आहे.

चेतन निर्दोष आहे 

चेतनचे काका उदाराम चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं आहे की चेतनचा या प्रकरणात सहभाग नाही. तो पूर्णपणे निर्दोष आहे आणि त्याला एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं आहे. दुकानात वारंवार फोन येत असल्यामुळं त्यानं आपला फोन सोबत घेतला होता. नीरजसुद्धा त्याच्यासोबतच होता. चेतनने काय केले आणि का हे अजून कोणालाही माहित नाही.

तो असं कृत्य करू शकत नाही 

चेतन कोणाचाही खून करू शकत नाही असं यावेळी त्याच्या काकांनी सांगितलं आहे. तो कोणाचाही खून करू शकत नाही. खेळामध्ये आवड असलेला तो अतिशय साधा मुलगा आहे. तो कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी होणार नाही. आम्ही सियाला ओळखत नाही. तिच्याबद्दल आम्हाला फक्त मीडियातून माहिती समजत असल्याचं यावेळी चेतनच्या काकांनी बोलताना म्हटलं आहे. एकीकडे गोयल आणि अग्रवाल कुटुंबाचे संबंध आहेत असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडं चौधरी यांनी आपण मात्र सिया किंवा तिच्या कुटुंबाला ओळखत नाही असं म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pune Crime: अल्पवयीन आरोपींना गाडीच्या बोनेटला बांधून धिंड, वादग्रस्त व्हिडिओनंतर पोलीस निरीक्षकांची बदली
Cricketer Suicide: टीममध्ये निवड झाली नाही, नागपूरच्या 17 वर्षीय महिला क्रिकेटरची आत्महत्या