काही प्रश्नांची उत्तर मला कधीच मिळणार नाहीत, सिया गोयलने केतनची टाकलेली स्टोरी व्हायरल

Published : Jun 23, 2026, 08:39 PM IST
ketan agrwal and siya goel

सार

लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचा मृत्यू सुरुवातीला अपघात वाटत होता, पण पोलीस तपासात ही एक पूर्वनियोजित हत्या असल्याचे उघड झाले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन यांनीच त्याला ढकलून दिल्याचे समोर आले असून, सियाची एक इंस्टाग्राम स्टोरी आता व्हायरल झाली आहे.

लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवालचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला त्याचा पाय घसरून मृत्यू झाला असं सांगण्यात येत होतं. पण पोलीस तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे. केतनचा पाय घसरून नव्हे तर सियाच्या मित्राने ढकलून दिल्यानं मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं. आता याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सियाची इंस्टाग्राम स्टोरी झाली व्हायरल 

सिया गोयल हि केतन अग्रवालची होणारी पत्नी होती. ती आणि केतन सियाच्या वाढदिवसाच्या आधल्या रात्री लोहगड किल्यावर गेले होते. त्यादिवशी रात्री केतनचा मृत्यू झाला. सिया आणि तिचा मित्र चेतन यांनी केतनला मारल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर सियाने केतनबद्दल इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. ती स्टोरी आता चर्चेत आली आहे.

सिया स्टोरीमध्ये काय म्हणते? 

त्या पोस्टमध्ये सिया म्हणते की, तू मला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सोडून गेलास. आपण लग्नाच्या मोमेंटच्या अगदी जवळ आलो होतो. माझे काही प्रश्न होते, काही स्वप्न होते त्यांचे उत्तर मला कधीच मिळणार नाही. मी तुझ्यावर इतकं प्रेम करत असताना तू मला का सोडून गेलास? तुझ्या आत्म्यास शांती मिळो." सियाची हि स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

पुणे पोलिसांनी हत्या असल्याचं केलं स्पष्ट 

पुणे पोलिसांनी केतनचा मृत्यू हि एक पूर्वनियोजित हत्या आहे असं सांगितलं आहे. तपास करणाऱ्या पोलिसांच्या मते सिया आणि चेतन हे दोघे एकमेकांना वर्षांपासून ओळखत होते. त्यांनी दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचला. रात्रीच्या वेळेस केतनला ढकलून दिलं आणि त्याची हत्या केली. पुणे पोलिसांच्या तपासात सर्व माहिती समोर आली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Pune Lohagad case l पुणे ग्रामीण पोलिसांनी सांगितली संपूर्ण घटना । Pune Police
Ketan Agrawal Pune Case | सिया गोयलच्या शॉकिंग गोष्टी,केतनच्या आईवडिल, आजोबांनी सर्व स्टोरी सांगितली