Viral Video: ७ सीटर कारमध्ये १६ जण! दिल्ली पोलिसांना २००० रुपये देऊन सुटल्याचा ड्रायव्हरचा दावा

vivek panmand   | CMS
Published : Oct 09, 2026, 09:11 PM IST
Viral Video: ७ सीटर कारमध्ये १६ जण! दिल्ली पोलिसांना २००० रुपये देऊन सुटल्याचा ड्रायव्हरचा दावा

सार

दिल्लीहून उत्तराखंडला जाणाऱ्या एका ७ सीटर अर्टिगा कारमध्ये चक्क १६ जण प्रवास करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी अडवल्यावर ५ हजार रुपये मागितले, पण २ हजार रुपये देऊन आपण सुटलो, असा दावा ड्रायव्हरने केला आहे. या ओव्हरलोडिंग आणि भ्रष्टाचाराच्या दाव्यावर सोशल मीडियात संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी केली जात आहे.

दिल्लीहून उत्तराखंडला जाणाऱ्या एका ७ सीटर कारमध्ये चक्क १६ जण प्रवास करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे रस्ते सुरक्षा आणि पोलिसांच्या भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मारुती सुझुकी अर्टिगा या कारमध्ये लहान मुलांसह अनेक प्रवासी कोंबून भरलेले दिसत आहेत. एवढंच नाही, तर कारच्या टपावर सामानाचा डोंगर रचला आहे. यात लोखंडी पेटी, सामानाने भरलेली पोती आणि ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या वस्तूंचा समावेश आहे.

पोलिसांना पैसे देऊन सुटल्याचा ड्रायव्हरचा दावा

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ड्रायव्हरला विचारतो की, ७ सीटर गाडीत एवढे प्रवासी घेऊन तू कसा काय आलास? दिल्ली पोलिसांनी तुला अडवलं नाही का?

यावर ड्रायव्हर सांगतो की, दिल्लीतून येताना पोलिसांनी त्याला अडवलं होतं. सुरुवातीला त्यांनी ५ हजार रुपयांची मागणी केली, पण नंतर २ हजार रुपये दिल्यावर त्यांनी गाडी सोडून दिली.

अर्थात, या दाव्याची अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसेच, व्हिडिओमध्ये उल्लेख केलेल्या पोलिसांवर किंवा ड्रायव्हरवर काही कारवाई झाली की नाही, याचीही माहिती समोर आलेली नाही.

सोशल मीडियावर कडक कारवाईची मागणी

हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत. अनेकांनी दिल्ली पोलीस, दिल्ली ट्रॅफिक पोलीस, उत्तराखंड ट्रॅफिक पोलीस आणि राजकीय नेत्यांना टॅग करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

एका युजरने या घटनेला भ्रष्टाचाराचं उत्तम उदाहरण म्हणत जबाबदार लोकांवर कारवाईची मागणी केली. तर दुसऱ्याने अशा धोकादायक प्रवासाला आळा घालण्यासाठी कडक नियम लागू करण्याची विनंती केली.

काही युजर्सनी मात्र प्रवाशांनाही खडेबोल सुनावले आहेत. 'फक्त प्रशासनाला दोष देण्यापेक्षा प्रवाशांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी,' असं मत काहींनी मांडलं.

एका युजरने तर गाडीवरच्या सामानाची खिल्ली उडवत विचारलं, "भाऊ, नोएडाहून उत्तराखंडला पलंग न्यायचा असेल तर किती भाडं घेशील?"

ओव्हरलोडिंगमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

उत्तराखंडच्या डोंगराळ भागात जाण्यासाठी टॅक्सी हा प्रवासाचा मुख्य आधार आहे. पण गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणे म्हणजे थेट जीवाशी खेळण्यासारखे आहे.

गाडीत क्षमतेपेक्षा जास्त लोक असल्यामुळे प्रवाशांना नीट बसता येत नाही आणि सीट बेल्टही लावता येत नाही. त्यातच टपावर एवढं सामान असल्यामुळे गाडीचा बॅलन्स बिघडू शकतो. डोंगराळ आणि वळणावळणाच्या रस्त्यांवर अशा प्रकारच्या ओव्हरलोडिंगमुळे मोठ्या अपघाताचा धोका वाढतो.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Uttan Viral Video: पोलिसांसमोरच 'मी इथला बॉस' म्हणत शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल
Kuwait Bus Accident: कुवेतमध्ये कामगारांच्या बसला भीषण अपघात, २२ जण जखमी