Hamirpur Viral Video: लेकीने प्रियकराला निवडलं, संतापलेल्या आईने कोर्टाबाहेर मुलाच्या बापाला चपलेने बदडलं

vivek panmand   | CMS
Published : Oct 02, 2026, 09:53 PM IST
Hamirpur Viral Video: लेकीने प्रियकराला निवडलं, संतापलेल्या आईने कोर्टाबाहेर मुलाच्या बापाला चपलेने बदडलं

सार

यूपीच्या हमीरपूरमध्ये एका तरुणीने कोर्टात प्रियकरासोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे संतापलेल्या मुलीच्या आईने कोर्टाबाहेरच मुलाच्या वडिलांना चपलेने मारहाण केली. ही मुलगी कानपूरच्या तरुणासोबत पळून गेली होती. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

उत्तर प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यात प्रेमप्रकरणातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने घरातून पळून जाऊन प्रियकरासोबत राहण्याचा निर्णय घेतला. कोर्टात तिने तसा जबाबही दिला. पण हे ऐकून संतापलेल्या मुलीच्या आईने कोर्टाबाहेरच मुलाच्या वडिलांना चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुलगी प्रियकरासोबत पळून गेली होती

हे प्रकरण हमीरपूरच्या बिवांर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. २० सप्टेंबर रोजी ही तरुणी कानपूरच्या बिठूर भागात राहणाऱ्या एका तरुणासोबत घरातून पळून गेली होती. पोलिसांनी बुधवारी तिचा शोध घेतला आणि तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर गुरुवारी तिचा जबाब नोंदवण्यासाठी तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, अशी माहिती आज तकच्या एका वृत्तात देण्यात आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, या तरुणीने कोर्टात स्पष्ट सांगितलं की तिला तिच्या प्रियकरासोबतच राहायचं आहे. तिचा हा जबाब ऐकून कोर्टाबाहेर वाट पाहत असलेली तिची आई प्रचंड संतापली.

आईने मुलाच्या वडिलांना बदडलं

मुलीचा जबाब ऐकल्यानंतर या महिलेने थेट मुलाच्या वडिलांना गाठलं आणि त्यांच्यावर हल्ला केला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ही महिला मुलाच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी आणि चपलेने मारहाण करताना दिसत आहे. हा सगळा प्रकार कोर्टाच्या आवाराबाहेर घडला.

या मारहाणीनंतर ही महिला एका बोलेरो गाडीत बसून तिथून निघून गेली.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. मुलीच्या प्रेमप्रकरणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये झालेला हा राडा लोकांचं लक्ष वेधून घेत आहे.

पोलिसांत अद्याप तक्रार नाही

या मारहाणीप्रकरणी अद्याप कोणत्याही बाजूने अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

हमीरपूरचे सर्कल ऑफिसर (सदर) यशपाल सिंह यांनी सांगितलं की, या घटनेबाबत पोलिसांना कोणतीही माहिती किंवा लेखी तक्रार मिळालेली नाही. जर कोणत्याही पक्षाने पोलिसांत तक्रार केली, तर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Chhattisgarh Bus Accident: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, बस झाडाला धडकून ६ जणांचा मृत्यू
Kakkanad Drug Case: ६ महिने पोलिसांना गुंगारा देणारी महिला अखेर गजाआड