Ujjain Abduction Case: उज्जैनमध्ये तरुणीचं अपहरण? नंतर व्हिडिओ आला समोर, म्हणाली 'मी स्वतःच्या मर्जीने...'

vivek panmand   | CMS
Published : Oct 01, 2026, 03:40 PM IST
car drag

सार

उज्जैनमध्ये मंगळवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणीचं तिच्या घराबाहेरून अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली. काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोन तरुणांनी तिला जबरदस्तीने गाडीत ओढून नेल्याचा आरोप आहे.

उज्जैनमध्ये मंगळवारी रात्री एका १९ वर्षीय तरुणीचं तिच्या घराबाहेरून अपहरण करण्यात आलं. काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या दोन तरुणांनी तिला जबरदस्तीने गाडीत बसवलं. तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ती घराबाहेर उभी होती. त्याचवेळी नंबर प्लेट नसलेल्या एका काळ्या कारमधून दोन तरुण आले आणि त्यांनी तिला ओढत गाडीत टाकलं.

घरच्यांनी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या तरुणांनी त्यांना जुमानलं नाही आणि ते तरुणीला घेऊन पसार झाले. या संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून, त्यात अपहरणाचा हा थरार स्पष्ट दिसत आहे.

तरुणीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवला आणि तातडीने शोध मोहीम सुरू केली.

जिवाजीगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रतीक शर्मा यांनी सांगितलं की, माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपीची ओळख पटवली असून, दुसरा संशयित त्याचा साथीदार असल्याचं निष्पन्न झालं आहे.

पोलीस आता आरोपीचा मोबाईल नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याचा फोन बंद असल्यामुळे लोकेशन शोधण्यात अडचणी येत आहेत.

पोलिसांचं एक पथक त्या काळ्या कारची माहिती काढत आहे, तर दुसरं पथक अपहरणानंतर गाडी कोणत्या दिशेने गेली, याचा तपास करत आहे.

आरोपींना पकडण्यासाठी आणि गाडीचा मार्ग शोधण्यासाठी पोलीस आजूबाजूच्या परिसरातील इतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत आहेत.

तरुणीचा व्हिडिओ आला समोर, म्हणाली 'मी स्वतःच्या मर्जीने गेले'

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. या व्हिडिओमध्ये ती तरुणी आणि तो तरुण आपण दोघांच्या संमतीने एकत्र असल्याचा दावा करत आहेत.

पोलीस अधिकारी शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचा शोध लागल्यानंतर सक्षम अधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवला जाईल.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Rajasthan Honour Killing: लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रेयसीला संपवलं, ४ जणांना जन्मठेप
Thane Firing | प्रदीप पूर्णेकरांच्या सासऱ्यांची न्यायाची मागणी