Thane Road Rage: ठाण्यात राँग साईडने येणाऱ्या दुचाकीस्वाराची दादागिरी, कुटुंबाला मारहाणीचा प्रयत्न

vivek panmand   | CMS
Published : Oct 07, 2026, 04:42 PM IST
Thane Road Rage: ठाण्यात राँग साईडने येणाऱ्या दुचाकीस्वाराची दादागिरी, कुटुंबाला मारहाणीचा प्रयत्न

सार

ठाण्यातील तीन हात नाका परिसरात एका दुचाकीस्वाराने राँग साईडने येऊन कारमधील जोडप्याला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या कारमध्ये १४ महिन्यांचं बाळही होतं. या व्यक्तीने कारवर हात मारत पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

ठाण्यातून एक संतापजनक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. तीन हात नाका परिसरात एका दुचाकीस्वाराने राँग साईडने येऊन कारमधील जोडप्याला चक्क धमकावलं. या कारमध्ये त्यांचं १४ महिन्यांचं बाळही होतं. ६ ऑक्टोबरला टिप टॉप प्लाझाजवळ हा प्रकार घडला. व्हिडिओमध्ये हा माणूस जोडप्यासोबत हुज्जत घालताना दिसतोय. तो राँग साईडने आला आणि त्यानेच कारचा रस्ता अडवला. वरून कार चालकानेच आपल्याला धडक देण्याचा प्रयत्न केल्याचा कांगावा तो करत होता. या बाचाबाचीदरम्यान त्याने कारजवळ येऊन खिडकीतून चालकाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला.

आपण या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं जोडप्याने त्याला सांगितलं. त्यानंतर हा वाद आणखीच वाढला. बाहेर हा माणूस सतत भांडत होता आणि आतमध्ये १४ महिन्यांचं बाळ भीतीने रडत होतं. अखेर आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी करत हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.

स्वीटी पांडे वर्मा यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ आपण स्वतः रेकॉर्ड केल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या पोस्टनुसार, हे कुटुंब आपल्या घरी परतत होतं. त्यावेळी तीन हात नाक्याजवळ समोरून एक दुचाकीस्वार राँग साईडने त्यांच्या दिशेने आला.

स्वीटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो रस्ता फक्त यू-टर्न घेणाऱ्या गाड्यांसाठी होता. तिथे गाड्यांना विरुद्ध दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी बॅरिकेड्सही लावले होते. पण आपली चूक मान्य करण्याऐवजी, हा माणूस थेट त्यांच्या कारजवळ आला. त्याने कारच्या दरवाजावर जोरजोरात हात मारले आणि पतीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हायरल व्हिडिiओ

या माणसाने रागाने ओरडत कुटुंबाकडे बोट दाखवलं आणि पतीच्या अंगावर हात उगारत कारमध्ये हात घातला, असंही स्वीटी यांनी सांगितलं. हा माणूस दारूच्या नशेत असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केलाय. "मी राँग साईडने आलो तर काय झालं?" असा उलट सवाल तो करत होता. अर्थात, या दाव्यांची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या घटनेनंतर महिलेने ठाणे पोलीस आणि ठाणे वाहतूक पोलिसांना टॅग करत कारवाईची मागणी केली आहे. राँग साईडने गाडी चालवणे आणि कुटुंबासोबत केलेल्या या अरेरावीबद्दल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

POCSO Case: १५ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार, ४३ वर्षीय नराधमाला ४७ वर्षांची सक्तमजुरी
Telangana Crime: चहा विक्रेत्याने पोलीस स्टेशनबाहेर स्वतःला पेटवून घेतले