मुंबईत सेक्स रॅकेटचा भांडाफोड, 4 अभिनेत्रींची सुटका तर दलाल अटक

Published : Mar 15, 2025, 08:51 AM ISTUpdated : Mar 15, 2025, 08:52 AM IST
sex racket

सार

महाराष्ट्र पोलिसांनी मुंबईतील एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. यामध्ये 4 अभिनेत्रींची सुटका केली आहे. याशिवाय देहविक्रीचा व्यवसाय करण्याच्या आरोपाखाली एका दलाला अटक करण्यात आली आहे.

Sex Racket In Mumbai Busted : महाराष्ट्र पोलिसांकडून मुंबईतील देहविक्री व्यवसायचा भांडाफोड केला आहे. यासंदर्भात पोलिसांनी छापेमारी करत आरोपीला अटक केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे.

सेक्स रॅकेटचा भांडाफोड

मुंबई पोलिसांनी शुक्रवारी 14 मार्चला मुंबईतील पवई येथे एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. या दरम्यान, पोलिसांनी 4 महिलांना हॉटेलमधून रेस्क्यू केले आहे. याशिया एका दलाला अटक केली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, देहविक्री व्यापारात सहभागी असणाऱ्या या 4 महिला स्ट्रगलिंग अभिनेत्री आहेत.

दलाला अटक

अधिकाऱ्यांच्या मते, मुंबई पोलिसांना गुप्त सूचना मिळाल्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळीच सेक्स रॅकेटचा भांडाफोड झाला. यादरम्यान, पोलिसांनी रॅकेट चालवणाऱ्या एका व्यक्तीलाही अटक केली आहे. संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. याशिवाय आरोपीचीही कसून चौकशी करण्यात येतेय.

गुप्त सूचना मिळाल्यानंतर भांडाफोड

एका अधिकाऱ्यांच्या मते, पोलिसांना गुप्त सूचना मिळाल्यानंतर हॉटेलमध्ये सापळा रचून महिलांना देहविक्री व्यवसायामध्ये ढकलण्याच्या आरोपाखाली श्याम सुंदर अरोडा नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी म्हटले की, इंडस्ट्रीमध्ये आपली ओखळ निर्माण करण्यासाठी पीडित महिला संघर्ष करत आहे. यापैकी एका पीडित महिलेने हिंदी मालिकेत काम देखील केले आहे.

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून