धक्कादायक! पुण्यात शासकीय बसमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपीवर 1 लाखांचे बक्षीस जाहीर

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर शासकीय बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पुणे हादरले गेले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेचा सध्या शोध घेतला जात आहे.

Pune Rape Case Update : पुण्यात शासकीय बसमध्ये झालेल्या तरुणीवरील बलात्काराने संपूर्ण पुणे हादरले गेले आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असणाऱ्या शासकीय बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील आरोपीचे नाव दत्तात्रेय गाडे असून त्याच्यावर आधीपासूनच काही गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर पुणे आणि अहिल्यानगरमध्ये 6-7 गुन्हे दाखल आहेत. वर्ष 2019 पासून दत्तात्रेय जामीनावर बाहेर आहे. अशातच तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा आता कसून शोध घेतला जात आहे. याशिवाय आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीसही लावण्यात आले आहे. यासंदर्भातील एक प्रसिद्धपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. 

तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर आंदोलन केले जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संपूर्ण शहरात आंदोलन पेटले आहे. विरोधक सातत्याने महाराष्ट्रातील सरकारवर टीका करत आहे. अशातच सरकारने बस स्थानकात तैनात असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय परिवहन विभागाला या प्रकरणात विभागीय तपासाचे आदेश दिले आहेत.

ताई बोलून केला बलात्कार

पुण्यातील स्वारगेट बस डेपो महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमधील सर्वाधिक मोठा डेपो आहे. पीडित तरुमी मेडिकल फिल्डमध्ये काम करते. तिने म्हटले की, मंगळवारी (25 फेब्रुवारी) सकाळी 5.45 मिनिटांनी फलटण, साताऱ्यासाठी जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. त्यावेळी एक व्यक्ती तिच्याकडे येत तिला ताई म्हणाला. या व्यक्तीने साताऱ्यासाठीची बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली असल्याचे म्हटले.

यानंतर आरोपीने पीडित तरुणीला शिवशाही एसी बसमध्ये नेले. बसमधील लाईट्स बंद होत्या. पीडित तरुणी बसमध्ये चढण्यास घाबरत होती तरीही आरोपीने तिला चढण्यास सांगितले आणि त्याचवेळी बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.

चार तासांनी घटनेबद्दल कळले

एमएसआरटीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, रिकामी असणारी बस 25 फेब्रुवारीला पहाटे 3.40 मिनिटांनी सोलापूर येथून आली होती. रिपोर्टमध्ये असेही लिहिले आहे की, आरोपीने स्वत:ला बस कंडक्टर असल्याचे पीडित तरुणीला भासवले. घटनेबद्दल बस स्थानकातील अधिकाऱ्यांना सकाळी 10 वाजता म्हणजेच घटनेच्या चार तासांनंतर याबद्दल कळले.

आणखी वाचा : 

स्वारगेट बसस्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपीची पटली ओळख

बलात्कार प्रकरणातून माजी नगरसेवक निर्दोष मुक्त, घर मात्र उद्ध्वस्त

Share this article