AIच्या माध्यमातून महिला डॉक्टरचे बनावट अश्लील व्हिडीओ; कराडमधील डॉक्टरच निघाला सूत्रधार?

Published : Jun 12, 2025, 10:18 AM IST
Mohalla Doctor

सार

कराडमध्ये काही महिलांचे एआयच्या मदतीने काही अश्लील बनावट व्हिडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. 

Maharashtra : साताऱ्यातील कराड शहरातून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने वैद्यकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजवली आहे. दोन नामांकित महिला डॉक्टरांचे AI (Artificial Intelligence) च्या सहाय्याने बनावट अश्लील व्हिडीओ तयार करून प्रसारित करण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कराडमधील डॉ. राजेश शिंदे आणि पंजाबमधील विकास शर्मा यांना ताब्यात घेतले असून, चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत.

AI चा गैरवापर करून अश्लील व्हिडीओ तयार

पोलिस तपासात उघड झाले आहे की, आरोपी विकास शर्माने डॉ. शिंदे यांच्या सांगण्यावरून अश्लील व्हिडीओ तयार केले. यासाठी पंजाब राज्यातून व्हिडीओ तयार करून घेण्यासाठी डॉ. शिंदे यांनी आर्थिक मदत दिली. विकास शर्मा आणि डॉ. शिंदे हे कॉलेजचे मित्र असून, शर्मा याला पैशांची गरज असल्याने डॉ. शिंदे याने त्याला हा ‘टास्क’ दिला होता.

या महिलांना लक्ष्य केलं

या बनावट व्हिडीओमध्ये कराडमधील दोन महिला डॉक्टर, एक सामाजिक कार्यकर्ती आणि आणखी एका कार्यकर्त्याचा समावेश असल्याचं समजतं. तक्रारकर्त्यांनी व्हिडीओ व्हायरल होण्याआधीच पोलिसांकडे धाव घेतली, त्यामुळे वेळीच या प्रकाराला आळा बसला.

व्हिडीओत काय दाखवले होते?

या बनावट व्हिडीओमध्ये संबंधित महिला डॉक्टर दोन युवकांसोबत अश्लील कृती करत असल्याचे दाखवण्यात आले होते. हे सर्व AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केलेले असले, तरी प्रत्यक्ष दृश्यांप्रमाणे दिसत होते. त्यामुळे सुरुवातीला हे खरे असल्याचा संभ्रम निर्माण झाला होता.

पोलिसांची तातडीची कारवाई

या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींकडून काही तांत्रिक साहित्य जप्त केले आहे. चौकशीदरम्यान संबंधित व्हिडीओ परराज्यात तयार झाल्याचे निष्पन्न झाले असून, ते पूर्णपणे बनावट असल्याचेही स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू आहे.

तांत्रिक बाबींचा कसून तपास

पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात तांत्रिक बाबींचा सखोल तपास केला जात असून, व्हिडीओ तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले AI सॉफ्टवेअर, कम्युनिकेशन माध्यमे, आर्थिक व्यवहार यावर विशेष लक्ष दिले जात आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hyderabad Crime : रियल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)
Gujarat Crime : लज्जास्पद! 6 वर्षीय मुलीसोबत निर्भयासारखा अत्याचार, गुप्तांगात घातला रॉड