पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीने झोपेतच दोन मुलांसमोर 15 वेळा चाकूने भोकसले; नवी मुंबईतील घटनेने खळबळ

Published : Jun 12, 2025, 08:34 AM ISTUpdated : Jun 12, 2025, 08:58 AM IST
Navi Mumbai Murder Case

सार

नवी मुंबईमधील सेक्टर 19 मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर झोपेतच वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याशिवाय दोन लहान चिमुरड्या मुलांसमोर आरोपीने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. 

Navi Mumbai : नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 19 मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे पतीने पत्नीचा खून करून स्वतःवर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. आरोपी गणेश शिरसाट याने पत्नी गौरी शिरसाट हिच्यावर चारित्र्यावर संशय घेत झोपेत असतानाच चाकूने तब्बल १५ वार करून तिचा नृशंस खून केला. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांच्या समोर घडली.

गणेशने पत्नीचा डोकं भिंतीवर आपटून व नंतर चाकूने वार करत हत्या केली. त्यानंतर स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे जोडपं कोपरखैरणे येथे राहत होतं. त्यांना दोन मुले असून त्यापैकी एक मुलगा दिव्यांग आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अनेकदा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे त्यांच्या नात्यात वाद होत असल्याचे शेजाऱ्यांकडून सांगण्यात आले.

पत्नी झोपेत असताना प्राणघातक हल्ला

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, गौरी शिरसाट झोपेत असताना गणेशने तिला आधी मारहाण केली आणि नंतर चाकूने १० ते १५ वार केले. मुलांनी हे सगळं प्रत्यक्ष पाहिल्यामुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून गणेश बरे झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

दुसरी धक्कादायक घटना सांगलीत

दरम्यान, सांगली जिल्ह्यातील कुपवाडमधील प्रकाशनगरमध्ये एका पत्नीने पतीचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिल लोखंडे या व्यक्तीचा पत्नी राधिकाने कौटुंबिक वादातून खून केला. रात्री साडेबाराच्या सुमारास वाद विकोपाला गेल्यानंतर राधिकाने अनिलच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Hyderabad Crime : रियल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)
Gujarat Crime : लज्जास्पद! 6 वर्षीय मुलीसोबत निर्भयासारखा अत्याचार, गुप्तांगात घातला रॉड