
Pune: भीमाशंकराच्या जंगलात चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा जेष्ठ नागरिकाने आरोप केला होता. ६९ वर्षीय जेष्ठ नागरिकाने हा रिक्षा चालकाच्या विरुद्ध बनाव केल्याच उघडकीस आलं आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास केला असून त्यामध्ये हा प्रकार खोटा असून रिक्षा चालक निर्दोष असल्याचं सिद्ध झालं आहे. या प्रकरणात बंद गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती पण पोलिसांनी रिक्षा चालकाला नोटीस देऊन सोडलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची अधिक माहिती दिली आहे. दिल्लीतील 69 वर्षीय ज्येष्ठ नागरिक पुण्याला आले होते. शनिवारी सकाळी त्यांनी रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन एका रिक्षा चालकाशी भीमाशंकर दर्शनासाठी करार केला. 15 हजार रुपयांमध्ये दर्शन करून परत येण्याचे ठरले. त्यापैकी 10 हजार रुपये रोख आणि उर्वरित ऑनलाइन स्वरूपात त्यांनी दिले.
पैसे ठरल्यानुसार रिक्षा चालक संबंधित प्रवाशाला घेऊन भीमाशंकर दर्शनासाठी घेऊन गेला. जेष्ठ नागरिक मंदिरात गेल्यानंतर तो तीन ते चार तास झाल्यानंतर बाहेर आलाच नाही. रिक्षा चालकाने प्रवाशाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळं तो परत पुण्याला निघून आला.
जेष्ठ नागरिकाने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालकाकडे चौकशीला सुरुवात केली. त्यावेळी तो घटनास्थळी थांबला होता; पण ज्येष्ठ नागरिक परत न आल्याने तो निघून गेला, असे त्याचे म्हणणे होते. पोलिसांनी दोघांची बाजू समजून घेतल्यानंतर जेष्ठ नागरिकाने बनाव केला होता हे समोर आलं आहे. खोटी तक्रार दाखल केल्यामुळं पोलिसांची मोठ्या प्रमाणावर धावपळ झाली. आता या तक्रारीवर पोलीस अधिक चौकशी करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.