महाविद्यालयातील 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, मृत्यूआधी पीडितीने सांगितली स्वत:सोबत घडलेली भयंकर स्थिती

Published : May 02, 2024, 03:45 PM ISTUpdated : May 02, 2024, 03:48 PM IST
death

सार

 Crime : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात राहणाऱ्या 18 वर्षीय तरुणीसोबत लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. प्रकरणातील पीडिताने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दलची भयंकर स्थिती उलगडून सांगितली.

Crime News : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात राहणाऱ्या एका 18 वर्षीय तरुणीसोबत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित तरुणीचे अपहरण करत तीन जणांनी तिला एका हॉटेलमध्ये नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराचे व्हिडीओ काढले आणि जबरदस्तीने विष पाजून एका अज्ञात ठिकाणी फेकून दिले. यानंतर पीडित तरुणीला एका व्यक्तीने रुग्णालयात दाखल केले. या घटनेची पोलिसांना माहिती देत पीडित तरुणीने म्हटले की, तिच्यासोबत लैंगिक शोषण करण्यात आले आहे. या घटनेचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीच्या काकांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी बीएडचे शिक्षण घेत असून शिकण्यासाठी तारानगर येथील महाविद्यालायत जाते. 30 एप्रिलला घरातून बाहेर पडल्यानंतर पीडित तरुणी पुन्हा घरी परतलीच नाही. त्याच दिवशी रात्री पीडित तरुणी रुग्णालयात असल्याचे कळले.

पीडित तरुणीने सांगितली स्थिती
पीडित तरुणीने पोलिसांना सांगितले की, महेश कुमार नावाच्या एका व्यक्तीने आपल्या दोन मित्रांसोबत एका हॉटेलवर जबरदस्तीने नेले. यानंतर हॉटेलवर सामूहिक बलात्कार करत काहीतरी पिण्यास दिले, खरंतर ते विष होते असे पीडित तरुणीने सांगितले.

पीडित तरुणीला एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेले असता तेथे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पीडित तरुणीचा मृतदेह कुटुंबाकडे सोपवा आहे. या घटनेवर गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

आणखी वाचा : 

Crime : खाजगी कंपनीच्या सेवानिवृत्त संचालक महिलेची मनी लॉन्ड्रिंगच्या नावाखाली फसवणूक, आरोपींनी असा घातला कोट्यावधींचा गंडा

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी JDU नेत्याची हत्या, लग्नसमारंभावेळी परतताना करण्यात आला गोळीबार

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून