
रविवारी पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या एका तरुणाला मदत करण्यासाठी थांबलेल्या लोकांवर भरधाव कॉलेज बसने धडक दिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये, लुधियानातील माछीवाडा-कुहारा रोडवर काही लोक त्यांच्या दुचाकी घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. ते रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात मागून आलेल्या एका पिवळ्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी तिथे एक लहान मूलही होते.
या अपघातात जखमी झालेले किरणदीप सिंग यांनी सांगितले की, ते त्यांची गाडी दुरुस्त करण्यासाठी माछीवाडा येथे जात होते. रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत पडलेल्या एका स्कूटरवरील तरुणाला मदत करण्यासाठी ते आणि इतर लोक थांबले. त्या व्यक्तीला रस्त्यावरून बाजूला जवळच्या पेट्रोल पंपाकडे हलवले जात होते.
प्रदीप सिंग या आणखी एका जखमी व्यक्तीने सांगितले की, बसने त्यांना इतक्या जोरात धडक दिली की त्यांची पगडी उडून दूर पडली. त्यांच्या पायाला, पाठीला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे.
किरणदीप यांनी सांगितले की, बस चालक दारूच्या नशेत असल्याचे वाटत होते. ज्या पद्धतीने बसने त्यांना धडक दिली, त्यावरून हा पूर्वनियोजित हल्ला असू शकतो असे त्यांना वाटते. या घटनेनंतर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोलिसांना बोलावले आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले.
A tragic accident took place on Machhiwara Kuhara Rd in Ludhiana when a speeding college bus rammed into 4 people helping an intoxicated scooter rider and ran them over. All 4 are seriously injured and the police has taken the bus driver into custody.
#News #LatestNews #OnSpot https://t.co/a5woRskPaT
— OnSpot (@onspot_in) November 17, 2026
जखमींनी असाही दावा केला आहे की, रविवार असल्यामुळे माछीवाडा रुग्णालयात ड्युटीवर डॉक्टर नव्हते. त्यांना 'प्रथमोपचार' म्हणून इंजेक्शन दिले आणि नंतर दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले.