Pune Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू

Published : Jul 02, 2024, 08:40 PM IST
Pune Solapur Highway Accident

सार

Pune Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Pune Solapur Highway Accident : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचं टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय. इंदापूर तालुक्यातील डाळज येथे दुपारी हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यामध्ये गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झालाय. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत केली. जखमी प्रवाशाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमकं कसा झाला अपघात?

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेली (टी एस ०७ जी एल २५७४) ही गाडी डाळज हद्दीत आल्यानंतर अपघात झाला. या गाडीचा पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने साधारण 50 मीटर गाडी जमिनीला घासत येऊन कोसळली. गाडीने रस्त्यावर चार ते पाच पलट्या खात ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला जोरात धडक दिली, त्यानंतर नाल्यात जाऊन पडली. गाडीत सहा पुरुष होते त्यापैकी 4 जण जागीच ठार झाले होते, तर एकजण गंभीर जखमी झालाय तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे. जखमीवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

इरफान पटेल वय 24 वर्षे , मेहबूब कुरेशी ,वय 24 वर्षे , फिरोज कुरेशी, वय 26 वर्षे ,फिरोज कुरेशी वय 28 वर्षे हे सर्व जागीच मयत झाले आहेत. रफिक कुरेशी वय 34 वर्षे हा गंभीर जखमी झाला असून सय्यद इस्माईल सय्यद अमीर ह्याला किरकोळ मार लागला आहे. अपघातातील सर्वजण तेलंगणा राज्यातील नारायणखेड , तालुका जिल्हा मेंढक येथील आहेत. अपघाताची माहिती समजताच डाळज महामार्गाचे पोलीस तात्काळ घटनास्थळी जाऊन अपघातातील जखमींना व ठार झालेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

आणखी वाचा

UP Hathras Satsang Stampede : हाथरसच्या भोले बाबांच्या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन 107 जणांचा मृत्यू, चौकशीसाठी नेमणार उच्चस्तरीय समिती

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Hyderabad Crime : रियल इस्टेट व्यावसायिकाची निर्घृण हत्या, थरारक घटना CCTV मध्ये कैद (Watch Video)
Gujarat Crime : लज्जास्पद! 6 वर्षीय मुलीसोबत निर्भयासारखा अत्याचार, गुप्तांगात घातला रॉड