Beed Parli Firing : परळीतील गोळीबाराचा झाला उलगडा, मरळवाडी सरपंचाच्या खून प्रकरणात बबन गीतेंसह 5 जणांवर गुन्हा दाखल

Published : Jun 30, 2024, 11:05 AM IST
parli firing case

सार

Beed Parli Firing : परळीतील बँक कॉलनीत झालेल्या गोळीबारात सरपंच बाबुराव आंधळे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

Beed Parli Firing : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत शनिवारी रात्री गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यामध्ये मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांचा मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर झाले होते. या घटनेमुळे बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला असून या प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते (Baban Gite) यांच्यासह मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरी बोलावून झाडली डोक्यात गोळी

या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना झाले आहे.

नेमकं संपूर्ण प्रकरण काय?

परळीमध्ये रात्री झालेल्या गोळीबारामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये गोळीबाराचा हा थरार घडला. या गोळीबारामध्ये मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत. मृत झालेले बाबुराव आंधळे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत आहेत. त्यासोबतच जखमी झालेले ज्ञानबा गीते हे सुद्धा धनंजय मुंडे यांचे समर्थक आहेत तर तिसरे जखमी महादेव गीते हे बबन गीते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आहेत त्यांचे समर्थक आहेत. आता बाबुराव आंधळे यांच्या खुनाचा उलगडा झाला आहे.

आणखी वाचा : 

Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर 2 कारचा भीषण अपघातात चक्काचूर, 6 जणांचा जागीच मृत्यू

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून