पुण्यात उपचाराआधी रुग्णाकडे लाखो रुपयांची मागणी, गर्भवती महिलेचा मृत्यू

Published : Apr 04, 2025, 12:36 PM ISTUpdated : Apr 04, 2025, 12:37 PM IST
Pune pregnant woman death

सार

सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर पैशांच्या चणचणीमुळे उपचार करण्यास नकार दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या अशा वागण्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप पीडित महिलेच्या परिवाराने केला आहे.

Pune News : पुण्यातील सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशांअभावी उपचार करण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तनिषा भिसे असे पीडतेचे नाव असून उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

रिपोर्ट्सनुसार, पीडित तनिषाला प्रेग्नेंसीसंदर्भात गंभीर समस्या उद्भवल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिचा पती सुशांत भिसेने आरोप करत म्हटले की, रुग्णालयाने 10 लाख रुपये उपचारासाठी मागितले. याशिवाय अडीच लाख रुपयेही तातडीने भरतो असे सांगूनही रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिला.यामुळे पीडित तनिषाची प्रकृती अधिक बिघडली गेली.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य अमित गोरखे यांचा खाजगी सचिव म्हणून काम करत असलेल्या सुशांतने म्हटले की, पत्नीला जुळी मुलं होणार होती. यामुळे तातडीने उपचार करणे गरजेचे होते. पण उपचारासाठी नकार दिल्याने त्यांना नाइलाजाने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले.

या प्रकरणात सुशांत याने रुग्णालयावर गंभीर आरोप लावले आहेत. यावेळी सुशांतने म्हटले की, रुग्णालयाला रुग्णाएवजी पैशांना अधिक महत्व द्यावेसे वाटते. पण वेळीच उपचार आणि दाखल करून घेतले असते तर पत्नीचा जीव वाचला असता."

अमित गोरखे यांनी या आरोपांना दुजोरा देत म्हटले की, "मी आरोग्य मंत्रालयाच्या विशेष कर्तव्य अधिकाऱ्याशी (ओएसडी) संपर्क साधून हस्तक्षेप केला. परंतु रुग्णालयाने प्रवेश नाकारला. दुसऱ्या सुविधेचा शोध घेण्यात वेळ गेल्याने आम्ही तिला गमावले." गोरखे यांनी येत्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे.

या आरोपांना उत्तर देताना, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर म्हणाले, "माध्यमांमध्ये प्रसारित होणारी माहिती अपूर्ण आहे आणि रुग्णालयाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत आहे. आम्ही अंतर्गत चौकशी अहवाल तयार करत आहोत आणि सर्व संबंधित तपशील राज्य प्रशासनाला सादर करू. या टप्प्यावर मी अधिक भाष्य करू शकत नाही."

दरम्यान, पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी भिसे कुटुंबाचे जबाब नोंदवण्यात आल्याची पुष्टी केली. "सरकारच्या वैद्यकीय समितीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल," असे ते म्हणाले.

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून