Pune Crime : पुण्यात स्पा सेंटरवर छापा; उडी मारलेल्या महिलेचा मृत्यू, व्यवस्थापक गंभीर जखमी

Published : Feb 24, 2026, 12:01 PM IST
Pune Crime

सार

Pune Crime : पुण्यातील विमानगर येथे स्पा सेंटरवर छापा टाकताना महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक जखमी आहे.

Pune Crime : पुणे शहरातील विमानगर परिसरात स्पा सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान धक्कादायक घटना घडली. कारवाई सुरू असताना महिला कर्मचारी आणि स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यात महिलेचा मृत्यू झाला असून व्यवस्थापक गंभीर जखमी झाला आहे.

छाप्यादरम्यान उडी; उपचारांपूर्वी महिलेचा मृत्यू

‘द रुट्स स्पा’ येथे विमानतळ पोलिस ठाणे पथकाने रविवारी दुपारी सुमारे तीन वाजता छापा टाकला. कारवाईदरम्यान अटकेच्या भीतीने महिला कर्मचारी आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याची माहिती पोलिसांनी दिली. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला. व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

स्पा सेंटरच्या कारभाराची चौकशी सुरू

घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ पंचनामा केला. स्पा सेंटरचे परवाने, कर्मचारी नोंदी आणि इतर कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. बेकायदा प्रकारांबाबत तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. संबंधित मृत महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अनैतिक मानवी व्यापारप्रकरणी गुन्हा

स्पा सेंटरमध्ये देहविक्रीचा बेकायदा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप असून व्यवस्थापक व मालकाविरोधात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे. महिलेच्या मृत्यूची नोंद अपघाती मृत्यू म्हणून करण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Viral Video: ७ सीटर कारमध्ये १६ जण! दिल्ली पोलिसांना २००० रुपये देऊन सुटल्याचा ड्रायव्हरचा दावा
Uttan Viral Video: पोलिसांसमोरच 'मी इथला बॉस' म्हणत शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल