Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेकडून प्रियकराच्या हत्येने खळबळ; पोलिसांच्या हाती लागले तब्बल 80 सीसीटीव्ही फुटेज

Published : Aug 19, 2025, 01:14 PM IST
Murder

सार

छत्रपती संभाजीनगर येथे एका महिलेने प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला छावा संघटनेची प्रदेशाध्यक्ष आहे. 

मुंबई : छत्रपती संभाजीनगरात एका तरुणाच्या खून प्रकरणाने खळबळ उडवली आहे. छावा संघटनेत कार्यरत असलेल्या प्रदेशाध्यक्ष महिलेनेच आपल्या प्रियकराला अडसर ठरल्याने भाऊ व मित्राच्या मदतीने संपवले, असा धक्कादायक तपास पोलिसांनी उघड केला आहे.

मृत तरुणाची ओळख

सचिन पुंडलिक अवताडे (वय 32, रा. हर्सूल) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपी महिला भारती रवींद्र दुबे (वय 34, रा. कॅनॉट), मामेभाऊ दुर्गेश तिवारी (रा. खुलताबाद) आणि मित्र अफरोज अशी नावे पोलिस तपासात समोर आली आहेत.

प्रेमसंबंधातून वादाची ठिणगी

भारती ही पतीपासून विभक्त होऊन कॅनॉट प्लेस येथे राहत होती. सचिन व भारती यांची ओळख छावा संघटनेत काम करताना झाली. गेल्या चार वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र 31 जुलै रोजी दारू खरेदी करून ते दोघे भारतीच्या फ्लॅटवर गेले. त्याच दरम्यान दुर्गेश आणि अफरोज तेथे आले. त्यांच्यात वाद वाढला आणि तिघांनी मिळून सचिनवर बेदम मारहाण करून चाकूने हल्ला केला.

बेपत्ता झालेल्या सचिनचा शोध

सचिन 31 जुलैपासून बेपत्ता होता. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर हर्सूल पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली गेली. 13 ऑगस्ट रोजी शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे गोदावरी पात्रात मृतदेह आढळला. त्याच्या मानेवरील व हातावरील टॅटूंवरून ओळख पटली.

आरोपींचा पोलिसांच्या हाती पर्दाफाश

सचिन बेपत्ता झाल्यापासून भारतीही फ्लॅटवरून पसार झाली होती. पोलिसांनी तब्बल 80 सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघे आरोपी ताडपत्रीत मृतदेह नेत असल्याचे पुरावे मिळवले. त्यानंतर भारती बुलढाण्यातील साखरखेर्डा गावात शेतात लपून बसल्याचे समजताच तिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत भारतीने प्रेमसंबंधातील वादातून भाऊ दुर्गेश व मित्र अफरोज यांच्या मदतीने सचिनचा खून केल्याची कबुली दिली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून