Pune Crime : शाळेच्या सुटीतच चाकूने वार करून दहावीच्या विद्यार्थ्याचा खून, आठवीतल्या विद्यार्थ्याचा संतापजनक प्रकार

Published : Jun 26, 2025, 09:19 AM ISTUpdated : Jun 26, 2025, 09:48 AM IST
मृत मुलगा

सार

अहिल्यानगरमधील एका शाळेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका आठवीमधील मुलाने दहावीतील मुलाचा खून केला आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Pune Crime  : खेळताना मित्रांमध्ये वाद होणे सामान्य बाब आहे. अशातच क्रिकेटचा खेळ असला तर नक्कीच वाद होतात. पण पुण्यातील अहिल्यानगरमध्ये क्रिकेट खेळण्यावरुन चक्क एका मुलाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, घरासमोर क्रिकेट खेळण्याच्या वादातून आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने मधल्या सुटीतच दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने वार करून त्याचा खून केला. ही घटना शहरातील एका शाळेत बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

या प्रकरणी मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा दहावीत शिक्षण घेत होता आणि त्याच दिवशी त्याची बोर्डाची पुरवणी परीक्षा होती.शाळा दुपारी भरली होती आणि मधल्या सुटीत काही मुले खेळत होती तर काही जेवण करत होती.

तेव्हाच आठवीतील विद्यार्थ्याने अचानक शाळेच्या पोर्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकूने पोटात आणि डोक्यावर वार केले.त्या विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकांनी तात्काळ दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

हत्या केल्यानंतर आरोपी शाळेतच थांबला

घटनेनंतर आरोपी विद्यार्थी शाळेच्या परिसरातच थांबला होता. त्याचे पालक देखील घटनास्थळी आले. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करत आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले.

जुन्या वादातून खून

मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, त्यांचा मुलगा **आपल्या सासरच्या घरासमोर क्रिकेट खेळण्यासाठी जात असे. त्या परिसरातील एका कुटुंबाला हे पटत नसल्याने सतत भांडणे होत होती. "तुमच्या मुलाला समजवून सांगा, नाहीतर त्याला जिवंत सोडणार नाही," अशा धमक्या त्या कुटुंबाकडून मिळत होत्या.या वादावरून २०२४ मध्ये मयताच्या बहिणीने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. त्या जुन्या वादातूनच हा संतापजनक प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पुणे हादरलं, जुन्नरच्या कोकणकड्यावर सापडले तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील दुर्गावाडी येथील प्रसिद्ध कोकणकड्याच्या १२ फूट खोल दरीत चाळीस वर्षीय तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचे मृतदेह आढळल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे दोघेही बेपत्ता होते आणि त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत व्यक्तींची ओळख रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०) आणि रुपाली संतोष खुटाण (आंबोली, ता. जुन्नर) अशी पटली आहे. जुन्नर पोलिसांनी आणि स्थानिक बचाव पथकाने प्रतिकूल परिस्थितीत हे मृतदेह दरीतून बाहेर काढले.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

US : STI च्या वादावरुन अमेरिकन विद्यार्थ्याकडून प्रेयसीवर चाकू हल्ला, हत्येप्रकरणी ठरला दोषी
गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून