खेळावरुन वाद झाल्याने जाब विचारायला गेलेल्या मोठ्या भावाचा नाहक बळी, नक्की काय घडले वाचा सविस्तर

Published : May 06, 2025, 10:30 AM IST
Crime News

सार

Pune Crime News : पिंपरी-चिंचवड येथे खेळावेळी झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका मोठ्या भावाचा नाहक बळी गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नक्की काय घडले याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

Pune Crime News : पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या दोन लहान मुलांमध्ये ऑफलाइन गेमवरुन वाद झाला. यावेळी वादात मध्यस्थी आणि जाब विचारयला गेलेल्या 16 वर्षाच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश कुऱ्हाडे असे मृत मुलाचे नाव आहे. या प्रकरणात 19 वर्षांचा सोहेब शेखला पोलिसांनी अटक केली आहे.

नक्की काय घडले?

पोलिसांनी माहिती देत म्हटले की, गणेश याचा भाऊ कार्तिक आणि सोहेब दोघेजण गेम खेळत होते. यावेळी कार्तिक आणि सोहेबमध्ये वाद झाला असताना कार्तिकला मारहणा करण्यात आली. यामुळे कार्तिक खेळ तिथेच सोडून घरी आला.

घरी आल्यानंतर घटलेला प्रकार कार्तिकने मोठा भाऊ गणेशला सांगितला. अशातच जाब विचारण्यासाठी गणेश सोहेबकडे गेला. यावेळी सोहेबने गणेशच्या पायात पाय घातल्याने तो पडला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. एवढेच नव्हे गणेशला सोहबने मारहाण देखील केली.या सर्व प्रकारानंतर गणेशला रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून