मीरा रोड सुरक्षारक्षकांवर धारधार हत्याराने झाला हल्ला, मुंबईतील या हल्ल्यामागे कोणाचा आहे हात?

Published : Apr 28, 2026, 04:25 PM IST
Terrorist attack

सार

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात दोन सुरक्षारक्षकांवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी अमेरिकेतून परतलेल्या जईब जुबैर अन्सारी नावाच्या आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाचा तपास आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) करत आहे.

मुंबईजवळील मीरा रोड परिसरात दोन सुरक्षारक्षकांवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला ताबोडतोब अटक केली. ही घटना नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ घडली. आरोपीने सुरक्षारक्षकांशी वाद घालत अचानक धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुरक्षारक्षकांची काय आहेत नाव? 

जखमी सुरक्षारक्षकांची नावे राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो रमेश सेन अशी असल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध सुरू केला आणि अवघ्या दीड तासात त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपीची ओळख जईब जुबैर अन्सारी अशी झाली असून तो काही वर्षांपूर्वी अमेरिकेतून भारतात परतल्याची माहिती आहे. त्याच्या मोबाईलमधून काही संशयास्पद साहित्य आणि व्हिडिओ सापडल्याने तपास यंत्रणा सतर्क झाली आहे.

तणावाचे वातावरण झाले तयार 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) तपास आपल्या हाती घेतला आहे. हा हल्ला एकट्याने केलेला ‘लोन वुल्फ’ प्रकार आहे का, यासह कट्टरतेचा कोणताही संबंध आहे का, याचा तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे मीरा रोड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Telangana Crime: चहा विक्रेत्याने पोलीस स्टेशनबाहेर स्वतःला पेटवून घेतले
Satara Crime: टीव्ही आणि मोबाईलवरून वाद, बापानेच केली मुलीची बॅटने मारून हत्या