प्रेयसीला अमेरिकेत पाठवल्याने प्रियकराचा गोळीबार

हैदराबादमध्ये प्रेयसीला अमेरिकेत पाठवून नाते तोडल्याबद्दल प्रियकराने तिच्या वडिलांवर एअरगनने गोळीबार केला. या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्याला दुखापत झाली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हैदराबाद: प्रेयसीला अमेरिकेत पाठवून नाते तोडल्याबद्दल प्रियकराने तिच्या वडिलांवर गोळीबार केला. हैदराबादमध्ये ही घटना घडली. बलविंदर सिंग नावाच्या आरोपीने एअरगनने प्रेयसीच्या वडिलांवर हल्ला केला. बलविंदरने केलेल्या एका फेरीत प्रेयसीच्या वडिलांच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

रविवारी प्रेयसी आणि तिचे वडील राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये बलविंदरने गोंधळ घातला. वाद विकोपाला गेल्यावर त्याने एअरगनने गोळीबार केला. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बलविंदर हातात एअरगन घेऊन इमारतीत शिरताना दिसत आहे. गोळीबार केल्यानंतर बलविंदर घटनास्थळावरून पळून गेला.

सरूरनगर पोलीस ठाण्यात कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) आणि बीएनसीच्या इतर कलमांसह शस्त्रास्त्र कायद्यातील संबंधित कलमांखाली बलविंदरला अटक करण्यात आल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे. प्रेयसीशी असलेले नाते तोडल्याचा आरोप करून हा हल्ला करण्यात आला. बलविंदर आपल्या मुलीला प्रेमाच्या नावाखाली छळत होता आणि यावरून त्याने अलीकडेच आपल्याशी भांडण केले होते, असे वडिलांच्या तक्रारीत म्हटले आहे. ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Share this article