मुंबईत पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींवर अत्याचार, खारमध्ये धक्कादायक प्रकार

Published : Aug 21, 2024, 06:39 PM ISTUpdated : Aug 21, 2024, 06:41 PM IST
sexual assault priest

सार

मुंबईतील खार दांडा परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमन सिंग याला अटक केली आहे. ही घटना समोर येताच परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

मुंबई: बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईच्या खार दांडा परिसरात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. यात दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन सिंग असून तो फिर्यादी यांच्या शेजारी राहणार असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या खार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून परिसरातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

सुसंस्कृत आणि पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय?

कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर शहरात घडली. बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या दोन दिवसात अशाच प्रकारचे अनेक प्रकरण पुढे आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता राज्याचे राजकारणही आता तापू लागले आहे. तर दुसरीकडे बदलापूरच्या अत्याचाराच्या प्रकरणाला अवघे काही तास उलटत नाही तोच बदलापूर पाठोपाठ राज्यात पुणे, अकोला, ठाणे, मुंबईच्या खार येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.

अकोल्यात विद्यार्थीनींला अश्लील व्हिडीओ दाखवत अत्याचार

बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकाराने जिल्ह्याभरात संताप व्यक्त होत आहे.

आणखी वाचा : 

अकोल्यात 6 विद्यार्थिनींचा विनयभंग, अश्लील व्हिडीओ दाखवल्याचाही शिक्षकावर आरोप

 

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून