Kalyan Crime News : कल्याण पूर्वमध्ये एअर होस्टेसची आत्महत्या, मोबाईलमध्ये सापडल्या धक्कादायक बाबी

Published : Jan 13, 2026, 09:37 AM ISTUpdated : Jan 13, 2026, 09:48 AM IST
Woman crime

सार

Kalyan Crime News : कल्याण पूर्वमध्ये एअर होस्टेस नेहा पावशे यांनी प्रेमसंबंधातील छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप आहे. कौशिक पावशे या तरुणावर आर्थिक फसवणूक, मारहाण आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप झालेत.

Kalyan Crime News : कल्याण पूर्व परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या तरुणीने प्रेमसंबंधातील मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहा पावशे असे मृत तरुणीचे नाव असून, तिने राहत्या घरात गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

मोबाईल तपासणीत छळाचे संदेश, कुटुंबीयांचा संताप

पोलिसांनी तरुणीचा मोबाईल तपासल्यानंतर कौशिक पावशे नावाच्या तरुणाकडून तिला सातत्याने त्रास दिल्याचे संदेश आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोपीच्या नातेवाईकांना चौकशीसाठी पोलिस घेऊन जात असताना मृत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिस वाहन अडवून तीव्र संताप व्यक्त केला. आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक व मारहाणीचे आरोप

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कौशिक पावशे याने नेहाला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंधात अडकवले. त्यानंतर तिच्याकडून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक, वेळोवेळी मारहाण आणि धमक्या दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट असल्याने संतप्त नातेवाईक व महिलांनी पोलिस ठाण्यावर घेराव घातला.

2020 पासूनचे संबंध; हैदराबादपर्यंत छळाचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांचे 2020 सालापासून प्रेमसंबंध होते. लग्नाचे वचन देत आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मोठी रक्कम उकळल्याचा आरोप आहे. नेहाची हैदराबाद येथे बदली झाल्यानंतरही आरोपी तिथे जाऊन मारहाण केल्याचे पुरावे समोर आले आहेत. डिसेंबर महिन्यात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

पोलिस तपास सुरू, लवकरच अटकेचे संकेत

या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. बँक स्टेटमेंटमधून मृत्यूपूर्वीही आरोपीने मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचे संकेत मिळत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे प्रेमसंबंधांतील छळ आणि महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Family Court: पोटगी नाकारल्याने संतापलेल्या पत्नीने पतीला मारले, व्हिडिओ व्हायरल
Crime News : गर्भवती मुलीला बापानेच जीवे मारले; हुबळीत ऑनर किलिंग