
जयपूर कोर्टाबाहेर शनिवारी एका मौलानाला संतप्त जमावाने मारहाण केली. या मौलानाने एका १८ वर्षीय मदरसा विद्यार्थिनीशी लग्न केल्याचा आरोप आहे, विशेष म्हणजे तो आधीच विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. जमावाच्या या हल्ल्यातून मौलानाला वाचवण्यासाठी पोलिसांना खूप धडपड करावी लागली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतता भंग केल्याच्या संशयावरून जयसिंगपुरा खोर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते आणि शनिवारी दुपारी त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.
मात्र, कोर्टातून बाहेर पडत असतानाच संतप्त जमावाने मौलानाला गाठले. पोलिसांसमोरच त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अखेर पोलिसांनी जमावातून त्याची कशीबशी सुटका केली आणि त्याला सुरक्षित स्थळी नेले.
एसएचओ रघुवीर सिंह यांनी सांगितले की, आरोपी हा नई की थडी परिसरातील एका मदरशात मौलाना होता. तिथे आसपासच्या परिसरातील मुली शिकायला येत असत.
पोलिसांच्या मते, हा मौलाना मदरशात शिकवताना मुलींच्या मनावर प्रभाव टाकत असे. याच संस्थेत शिकणाऱ्या एका १८ वर्षीय विद्यार्थिनीला त्याने जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. मौलाना आधीच विवाहित असून त्याला तीन मुले आहेत, हे माहीत असूनही ती मुलगी त्याच्याशी लग्न करण्यावर ठाम होती. तिच्या घरच्यांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकले नाही. नुकतेच घरच्यांच्या संमतीशिवाय तिने त्याच्याशी लग्न केल्याचे समजते.
🚨 CHAOS AT JAIPUR COURT!
A Maulana was allegedly assaulted inside a court complex over accusations of influencing an 18-year-old madrasa student to marry him despite having a wife and three children.
Police later arrested him and sent him to jail. https://t.co/youtFBAH0k
— matlabi duniya (@ManjeetSin32075) November 10, 2026
या लग्नाबद्दल समजताच मुलीच्या कुटुंबीयांनी जयसिंगपुरा खोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
शनिवारी स्थानिक लोक पोलीस स्टेशनबाहेर जमा झाले आणि त्यांनी मौलानाच्या विरोधात निदर्शने केली. या निदर्शनांनंतर शांतता भंग केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.