
गुरुग्रामच्या गोल्फ कोर्स रोडवर एका महागड्या स्पोर्ट्स कारने स्टंटबाजी केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी या 'स्टंटबाज' तरुणाचा शोध सुरू केला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कारच्या नंबर प्लेटवरून या अज्ञात तरुण चालकाला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
या व्हिडिओमध्ये एक तरुण आपली स्पोर्ट्स कार गोल्फ कोर्स रोडवर अतिशय वेगाने वळवताना आणि ड्रिफ्टिंग करताना दिसत आहे.
या क्लिपमध्ये रस्त्यावर इतरही वाहने ये-जा करताना दिसत आहेत. अशा प्रकारच्या स्टंटमुळे इतर वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. ही घटना मध्यरात्री घडली असली, तरी तिची नेमकी तारीख अद्याप समजू शकलेली नाही.
Gurugram: Luxury Cars Allegedly Seen Racing, Performing Stunts on Golf Course Road
A video showing several luxury cars allegedly racing and performing dangerous stunts on a public road in Gurugram late at night has surfaced on social media and is going viral.
The footage,… pic.twitter.com/9zze8ZloUB— Atulkrishan (@iAtulKrishan1) September 25, 2026
काही तरुणांनी या स्टंटबाजीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आणि त्यानंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, "स्पोर्ट्स कारच्या नंबरवरून आम्ही गाडीच्या मालकाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. घटनेच्या वेळी गाडी कोण चालवत होतं, याचाही तपास सुरू आहे. सार्वजनिक रस्त्यांवर स्टंट करून वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल."