iPhone 18 Pro Theft: 'हा नवीन आयफोन आहे का?' असं विचारलं आणि ग्रेटर नोएडात महिलेचा iPhone 18 Pro पळवला!

vivek panmand   | CMS
Published : Sep 22, 2026, 03:43 PM IST
thief

सार

ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये एका महिलेचा नवाकोरा iPhone 18 Pro दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी पळवला. विशेष म्हणजे, चोरी करण्यापूर्वी त्यांनी महिलेला 'हा नवीन आयफोन आहे का?' असं विचारून खात्री केली. ई-रिक्षातून प्रवास करताना ही घटना घडली असून, आता पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने चोरांचा शोध घेत आहेत.

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, ग्रेटर नोएडा वेस्टमध्ये एका महिलेचा नवाकोरा आयफोन 18 प्रो (iPhone 18 Pro) दुचाकीवरून आलेल्या दोन चोरांनी हिसकावून नेला. शुभी भंडारी या ई-रिक्षाने कामाला जात असताना ही घटना घडली. त्यांनी ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी फोन बाहेर काढला, तेव्हा हेल्मेट घातलेले दोन तरुण दुचाकीवरून त्यांच्या मागे आले. आधी त्यांनी शुभी यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवलं आणि नंतर त्यांची नजर शुभी यांच्या हातातील फोनवर गेली.

चोरांनी शुभी यांना थेट विचारलं की, 'हा नवीन आयफोन आहे का?' शुभी यांनी होकार देताच, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता फोन हिसकावला आणि दुचाकीवरून धूम ठोकली.

हा फोन अवघ्या तीन दिवसांपूर्वीच विकत घेतला होता, त्यामुळे या घटनेचा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शुभी यांचे पती साकेत गुप्ता यांनी सांगितलं की, फोन अगदी नवाकोरा होता. चोरांनी आधी हा महागडा फोन पाहिला, तो ओळखला आणि मगच तो पळवण्याचा कट रचला, या गोष्टीची कुटुंबाला जास्त चिंता वाटत आहे. या घटनेनंतर कुटुंबाने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

सकाळी घडलेल्या या घटनेनंतर, मुख्य रस्त्यांवर पोलिसांची गस्त का दिसत नाही, असा सवालही कुटुंबाने उपस्थित केला आहे. अशा घटनांमुळे रस्त्यावरील गुन्हेगारी आणि मोबाईल चोरीच्या घटनांबद्दल भीती वाढल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाचा तपास करताना पोलीस आता घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे पोलीस त्या दुचाकीचा आणि दोन्ही संशयित चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Gemini AI: बाईकस्वाराने कारला धडक दिली; बंगळुरूच्या CEO ने 'जेमिनी'लाच बनवला वकील! पुढे काय झालं?
Delhi Viral Video: दिल्लीत थरार! कारने बाईकला फरफटत नेलं, ७३ वर्षीय ड्रायव्हरला अटक