नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 26 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नाशकात एकच खळबळ उडाली आहे.
नाशिक: आयकर विभागाने सुराणा ज्वेलर्सच्या नाशिक इथल्या कार्यालय आणि घराव छापा टाकला होता. ही कारवाई सलग तिन दिवस सुरू होती. यातून आयकर विभागाच्या हाती मोठं घबाड लागलं आहे. आयकर विभागाच्या या छाप्यात 26 कोटी रोख रक्कम आणि 90 कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.
नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सचे कार्यालय आणि घरी सलग तिन दिवस कारवाई सुरू होती. यावेळी अनेक गोष्टी तपासण्यात आल्या. व्यावसायिकाच्या मनमाड, नांदगाव मधील कुटुंबातील सदस्यांच्या घरी चौकशीही सुरू होती. नाशिक, नागपूर आणि जळगावच्या पथकातील 50 अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत तिन दिवसांच्या तपासणीनंतर तब्बल 26 कोटींची कॅश आणि 90 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रोख रक्कमेच्या पैशांची बंडल समोर आली आहेत. येवढे पैसे पाहून सर्व सामान्यांचे डोळे पांढरे होती.
आणखी वाचा:
मुंबई-आग्रा महामार्गावर हॉलिवूड पद्धतीने ट्रकवर पडला दरोडा, व्हिडीओ पाहून आपण घालाल तोंडात बोटे