कर्नाटकातील उडपीमध्ये दोन गटांत झाला राडा, एका व्यक्तीला स्विफ्टने उडवल्यामुळे त्याचा जागीच झाला मृत्यू?

Published : May 25, 2024, 02:55 PM ISTUpdated : May 25, 2024, 02:57 PM IST
karnataka udupi gang war

सार

कर्नाटकातील उडपी येथे दोन गटांमध्ये राडा झाला असून अपघातात एक जनाला उडवल्याचे दिसून आले आहे. दोन स्विफ्ट गाड्यांमध्ये लोक आले असताना त्यांनी एकमेकांशी भांडण केली असून यामध्ये एकाच मृत्यू झाल्याची शक्यता आहे. 

पुणे आणि नागपूर येथे हिट अँड रनची घटना घडल्यानंतर कर्नाटकमधील उडपी येथील एका गॅंगवारने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे दोन स्विफ्ट गाड्यांमधील लोक भांडताना दिसून येत असून त्यातील एका व्यक्तीच्या अंगावर गाडी घालण्यात आली. तो व्यक्ती जखमी झाला असून नंतर दुसऱ्या गाडीतील लोकांनी त्याला गाडीत टाकून नेल्याचे दिसत आहे. 

नेमकं काय झाले? - 
कर्नाटक राज्यातील उडपी येथे मध्यरात्री दोन गटांमध्ये गॅंगवार झाल्याचे दिसून आले आहे. या गॅंगवॉरमध्ये दोन स्विफ्ट गाड्या दिसून दिसून येत आहेत. या दोन गाड्यांमध्ये गॅंगमधील लोक असून दोघांमध्ये भांडण चालली आहेत. यामधील एका गाडीचे नुकसान झाले असून दुसरी गाडी ठोकली असल्याचे दिसते आहे. यातील लोक बाहेर येत असून एकमेकांच्या गादीवर वार करत आहेत. 

एका व्यक्तीच्या अंगावर घातली गाडी - 
एका व्यक्तीच्या अंगावर गाडी घातल्याचे यामध्ये दिसून आले आहे.काळी स्विफ्ट ही बाजूला असून दुसऱ्या बाजूला व्हाईट स्विफ्ट आहे. यात व्हाईट स्विफ्टवाल्याच्या गाडीवर एक व्यक्ती तलवार मारत असल्याचे दिसून आले आहे. त्यावर तलवार मारणारा व्यक्ती दुसऱ्या बाजूला गाडी नेल्यावर त्या तलवार मारणाऱ्या व्यक्तीच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करतो. ही गाडी त्याच्या बाजूने गेल्यानंतर तो खाली पडतो आणि परत दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. त्यानंतर काळ्या स्विफ्टमधील गॅंगचे कार्यकर्ते जवळ येतात आणि त्या पडलेल्या कार्यकर्त्याला उचलून गाडीत टाकतात. त्यानंतर एकजण जाळी ओलांडून पळून गेला असून नंतर काळ्या स्विफ्टमधील सगळे गाडीत बसल्याचे दिसून आले आहे. 
आणखी वाचा - 
Mumbai Water Cut: मुंबईत पाणीकपात जाहीर, 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार
Dombivli MIDC Blast: डोंबिवली स्फोटावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “घटना…”

PREV

Recommended Stories

गुजरात हादरलं! साडीवरून झालेल्या वादातून लग्नाच्या दिवशीच होणाऱ्या पतीने केला वधूचा खून
Sangali Crime : सांगली हादरली! राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवसाच्या कार्यक्रमात खून