Chhattisgarh Bus Accident: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, बस झाडाला धडकून ६ जणांचा मृत्यू

vivek panmand   | CMS
Published : Oct 22, 2026, 10:42 PM IST
Chhattisgarh Bus Accident: छत्तीसगडमध्ये भीषण अपघात, बस झाडाला धडकून ६ जणांचा मृत्यू

सार

जखमींना मनेंद्रगड आणि चिरमिरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

छत्तीसगडमधील भरतपूर जिल्ह्यात एक भीषण रस्ते अपघात झालाय. प्रवाशांनी भरलेली एक बस झाडाला धडकून ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झालेत. दुपारी मनेंद्रगड-केल्हारी रोडवरील एका वळणावर हा अपघात झाला.

या बसमध्ये एकूण ४६ प्रवासी होते आणि ती केल्हारीच्या दिशेने चालली होती. चालकाचं स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्याकडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली, अशी प्राथमिक माहिती आहे. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. तसेच जखमींपैकी चौघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.

अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने मनेंद्रगड आणि चिरमिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या दुर्दैवी घटनेवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी शोक व्यक्त केलाय. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

PREV
Crime News (गुन्हे बातम्या): Read Crime News LIVE Updates, Check पुणे क्राईम न्यूज, ठाणे क्राईम न्यूज, मुंबई क्राईम न्यूज & other trending news in Marathi at Asianet Marathi News .
Read more Articles on

Recommended Stories

Kakkanad Drug Case: ६ महिने पोलिसांना गुंगारा देणारी महिला अखेर गजाआड
Trivandrum Temple Theft: तिरुवनंतपुरममध्ये ३ मंदिरांमध्ये चोरी; सीसीटीव्हीमुळे रेल्वे स्टेशनजवळून २ चोरटे अटकेत