एका व्यक्तिने आपल्या पत्नीची चाकू भोसकून हात्या केली तर तिच्या कुत्र्याला ओव्हनमध्ये टाकून ठार मारले. ही खळबळजनक घटना इंग्लंडमध्ये घडली आहे.
इंग्लंडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २८ वर्षीय पतीने आपल्या पत्नीला चाकूने भोसकून मारले. यानंतर त्याने क्रोर्याची परिसीमा गाठली. त्याने त्याच्या पत्नीच्या शरीराचे तब्बल २०० तुकडे केले. यानंतर तिच्या आवडत्या कुत्र्याला ओव्हनमध्ये टाकून जीवंत जाळले. आरोपीने जवळपास आठवडाभरात शरीराचे तुकडे स्वयंपाकघरात फ्रीजमध्ये ठेवले होते.या संपूर्ण घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
इंग्लंडमधील २८ वर्षीय निकोलस मेटसनने शुक्रवारी त्याची २६ वर्षीय पत्नी होली ब्रेमलीची हात्या केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिस अधिकारी त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांनी त्याच्या पत्नी कुठे आहे असे विचारले. यावर त्याने गमतीने सांगितले की, ती पलंगाखाली लपली असावी असे उत्तर दिल्या नंतर संतप्त पोलिसांनी त्याची कसून विचारपूस केली त्यानंतर त्याने हत्या केल्याची कबुली दिली.यासाठी त्याने मित्राला ५० पौंड देखील दिले.
मित्राला ५० पौंड दिले :
मेटसनने बेडरुममध्ये पत्नीवर अनेक वेळा चाकूने वार केले. यानंतर तिचा मृतदेह त्याने बाथरूममध्ये नेला. या ठिकाणी त्याने तिच्या शरीराचे २०० हून अधिक तुकडे केले. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे प्लॅस्टिकच्या पिशवीत टाकले आणि स्वयंपाकघरात फ्रीजमध्ये लपून ठेवले. या घटनेनंतर सुमारे आठवडाभर पोलीस त्याच्या घरी तपासासाठी पोहोचले. दरम्यान, त्याने आपल्या मित्राला पत्नीच्या शरीराच्या अवयवांची विल्हेवाट लावण्यासाठी ५० पाउंड दिले.
विथम नदीत फेकला मृतदेह :
मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला निघालेल्या एका व्यक्तीला विथम नदीत प्लास्टिकच्या पिशव्या तरंगताना दिसल्या. एका पिशवीत मानवी हात आणि दुसऱ्यामध्ये ब्रॅमलीचे मुंडके होते. ही घटना पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी डायव्हर्सच्या मदतीने नदीत शोध घेतला असता मृतदेहाचे २२४ तुकडे सापडले. यातील काही तुकडे अद्याप सापडले नाहीत.ब्रॅमलीच्या आईने कोर्टात सांगितले की, तिच्या मुलीचे लग्न होऊन फक्त १६ महिने झाले होते. दोघांत मोठ्या प्रमाणात भांडणे होत असल्याने त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्या पूर्वीच मुलीची हात्या करण्यात आली.
आणखी वाचा :
केरळमधील जेएस सिद्धार्थनचा तब्बल २९ तास मानसिक छळ ; पोलीस अहवालात धक्कादायक माहिती