
पंजाबच्या मोगामध्ये दोन दुचाकीस्वार भामट्यांनी ८२ वर्षीय आजीचे सोन्याचे कानातले भरदिवसा ओरबाडून नेले. गुरु अर्जुन देव नगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. भामट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आजीजवळ दुचाकी थांबवली आणि अचानक त्यांचे कानातले ओरबाडले. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असून, त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक करून चोरलेले कानातले जप्त केले आहेत. तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.
हरजीत कौर (८२) असं या आजीचं नाव आहे. त्या आपल्या घराबाहेर खुर्चीवर बसल्या होत्या, तेव्हा दुचाकीवरून दोन संशयित आले. पत्ता विचारण्याचं नाटक करत त्यांनी आजीशी गप्पा सुरू केल्या.
आजी त्यांना माहिती देत असतानाच, मागे बसलेल्या भामट्याने अचानक त्यांचे सोन्याचे कानातले खेचले. आजी मदतीसाठी ओरडत राहिल्या, पण तोवर दोघेही वेगात पळून गेले.
पंजाब के मोगा स्थित अर्जुन देव नगर में बाइक सवार दो युवकों ने रास्ता पूछने के बहाने 83 वर्षीय बुजुर्ग महिला को अपना निशाना बनाया। आरोप है कि दोनों युवकों ने महिला के सोने के झुमके छीन लिए और मौके से फरार हो गए। घटना के बाद पुलिस ने CCTV फुटेज की जांच कर एक आरोपी को गिरफ्तार कर लिया है, जबकि दूसरे की तलाश जारी है। Via @GagandeepNews
#Moga #PunjabNews #SnatchingCase #CrimeNews #CCTVFootage #PoliceAction #GoldSnatching
— Tez Tarrar (@teztarrardelhi) November 7, 2026
घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांत रीतसर तक्रार दाखल केली. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून आरोपींची ओळख पटली आणि एकाला बेड्या ठोकण्यात यश आलं.
डीएसपी गुरप्रीत सिंग यांनी माहिती देताना सांगितलं, "गुरु अर्जुन देव नगरमध्ये हरजीत कौर या ८२ वर्षीय महिला घराबाहेर बसल्या असताना दोघांनी त्यांचे कानातले ओढून नेले".
"तक्रारीनंतर आम्ही तपास सुरू केला आणि परमिंदर सिंग नावाच्या संशयिताला अटक केली. त्याच्याकडून आम्ही कानातलेही जप्त केले आहेत. दुसरा आरोपी इंदरजीत सिंग याचा शोध सुरू असून त्यालाही लवकरच पकडलं जाईल," असं ते म्हणाले.
अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केलं जाईल. आणखी माहिती काढण्यासाठी त्याची चौकशी सुरू असल्याचंही डीएसपींनी सांगितलं.
"तपास पुढे जाईल तशी माहिती आम्ही देऊ", असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.