AI क्षेत्रात मोठी झेप! मुकेश अंबानींच्या रिलायन्ससोबत मेटाची भागीदारी; जामनगरमध्ये उभारला जाणार अत्याधुनिक डेटा सेंटर

Published : Jun 10, 2026, 07:48 PM IST
Mukesh Ambani

सार

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने मेटासोबत मिळून गुजरातच्या जामनगरमध्ये AI-सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी करार केला आहे. हा प्रकल्प भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांना अद्ययावत करेल आणि देशासाठी AI क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र दिवसेंदिवस वेगाने वाढतच चालली. यामध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मेटा यांच्यात AI-सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी करार झाला आहे. गुजरातमधील जामनगर येथे हा प्रकल्प उभारला जाणार असून भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा यामुळं अपडेट होणार आहेत. हा एक भारतासाठी एआयच्या जगातील महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

कोठे उभारणार अत्याधुनिक केंद्र? 

हे अत्याधुनिक केंद्र गुजरात राज्यातील जामनगर भागात उभारले जाणार आहे. रिलायन्स 168 मेगावॅट क्षमतेचे AI-रेडी डेटा सेंटर विकसित करणार आहे. त्यानंतर या सुविधेचा वापर मेटा करणार असून भविष्यात क्षमता वाढवण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. हे मेटाचे भारतातील पहिले समर्पित AI डेटा सेंटर ठरणार आहे.

भारताने पायाभूत सुविधांमध्ये घेतली मोठी झेप 

भारताने आता पायाभूत सुविधांमध्ये मोठी झेप घेतली आहे. रिलायन्स आणि मेटा कंपनीची भागीदारी भारताला जगाच्या नकाशावर स्वतःच स्थान निर्माण करायला मदत करणार आहे. केंद्र सरकार हे डेटा सेंटर आणि AI मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यामुळं भारतासाठी हा सर्वात मोठा सुवर्णकाळ ठरणार आहे.

शेअर बाजारात सकारात्मक प्रतिसाद 

या भागीदारीची घोषणा होताच गुंतवणूकदारांनीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली. बुधवारी व्यवहारादरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये वाढ नोंदवली गेली. AI आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील संधींमुळे कंपनीच्या भविष्यातील वाढीबाबत बाजारात गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढू शकते.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IndiGo CEO: इंडिगोला नवे बॉस! ब्रिटिश एअरवेजचे माजी प्रमुख विल्यम वॉल्श आता कंपनीचे नवे CEO
पगारदार सावधान! १ एप्रिलपासून इन्कम टॅक्सचे 'हे' कडक नियम लागू; बनावट भाडे पावत्यांचा खेळ आता संपला!